Pune Police Arrested Thief
Pune Police Arrested ThiefSaam Tv

Mumbai Crime News: चोरी करायला गेला अन् घेतला महिलेचा मुका, चोरटा बेरोजगार म्हणून..

Crime News in Malad: चोरी करण्याच्या हेतूनं घरात घुसलेल्या चोरट्याला कोणतेही मौल्यवान वस्तू न सापडल्यानं त्यानं चक्क महिलेचा मुका घेऊन पळ काढलाय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करत, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Published on

मुंबई उपनगरातील मालाडमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. चोरी करण्याच्या हेतूनं घरात घुसलेल्या चोरट्याला कोणतेही मौल्यवान वस्तू न सापडल्यानं त्यानं चक्क महिलेचा मुका घेऊन पळ काढलाय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करत, आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.

कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाडमधील कुरार भागात एक अजब चोरीची घटना घडलीय. चोरट्यानं मुद्देमाल नसून, थेट महिलेचा मुका घेऊन पळ काढला आहे. ३ जानेवारीला आरोपीविरोधात विनयभंग आणि दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली चोरट्याला अटक केली असून, घरात किमती मुद्देमाल न सापडल्याने त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

Pune Police Arrested Thief
Wardha Crime: बूट आणि इलेक्ट्रिक साहित्यातून तंबाखूची तस्करी, समृद्धी महामार्गावर तस्करांची टोळी गजाआड

पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 'पीडित महिला एकटी घरी होती. नंतर आरोपी चोरटा थेट घरात घुसला. चोरटा जसा घरात घुसला त्यानं सर्वात आधी दरवाजा आतून बंद केला. नंतर चोरट्यानं पीडित महिलेचे तोंड दाबून ठेवले. नंतर चोरट्याने त्या महिलेला घरात कुठे मौल्यवान वस्तू आहेत, याची विचारणा केली.

महागडे वस्तू, रोख रक्कम, मोबाईल आणि एटीएम कार्ड नेमके कुठे ठेवले आहेस? असा प्रश्न चोरट्याने महिलेला धमाकावत विचारला. त्यानंतर पीडित महिलेने घरात किमती मुद्देमाल नाही, असं सांगितलं. तेव्हा चोरटा घराची तपासणी न करता थेट पीडित महिलेचा मुका घेतला अन् चोरटा पसार झाला.

Pune Police Arrested Thief
Bhandara Crime : वडिल रागावल्याने घरातून निघून गेला; दोन महिन्यांपासून बेपत्ता युवकाचा जंगलात आढळला मृतदेह

ही घटना घडल्यानंतर, पीडित महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले. सगळी माहिती कुरार पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी आपल्या कुटुंबासोबत राहत असून, बेरोजगार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com