Pune News: 3788 सिम कार्ड, 7 सिम बॉक्स, लॅपटॉप...; गणेशोत्सवाआधीच पुण्यात ATS च्या कारवाईनं मोठी खळबळ

Pune Crime News: मोठी बातमी! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई, दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात एकाला बेड्या ठोकल्या!
Pune ATS Action
Pune ATS ActionSaam TV
Published On

Pune ATS News : राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे. लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी सर्वजण आतुर झाले आहेत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. दहशतवादी विरोधी पथकाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठी कारवाई केली आहे. छापेमारी करत कोंढवा परिसरातून एकाला ताब्यात घेतले आहेत. त्याच्याकडून तब्बल ३७८८ सिम कार्ड जप्त केले आहेत. त्याशिवाय लॅपटॉप अन् इतर साहित्यही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी नौशाद अहमद सिद्धी याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे.

Pune ATS Action
Viral Video : बाप्पा आले....! धो धो पावसात लाडक्या बाप्पांचे आगमन; T20 वर्ल्डकप थीम असलेली गणेश मूर्ती पाहिलीत का? VIDEO

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला आहे. या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड, सात सिम बॉक्स, वाय फाय आणि सिम्बॉक्स चालविण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केलाय.

विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू होतं. दहशतवादी विरोधी पथकाने या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्ष तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

Pune ATS Action
VIDEO: मुंबईतील GSB गणेश मंडळाने काढला 400 कोटींचा विमा

कोंढव्यातील मिठा नगर येथे असलेल्या एम ए कॉम्प्लेक्स परिसरात बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू होतं. याला कोणताही परवानगी घेण्यात आली नव्हती. दहशतवादी विरोधी पथकाला याबाबत गुप्त सुत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी आज छापेमारी करत मुद्देमाल जप्त केला. दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा दहशत विरोधी पथक सध्या तपास करत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या नौशादकडे चौकशी करत आहेत.

Pune ATS Action
Telegram CEO Pavel Durov : टेलिग्रामच्या CEO ला जिच्यामुळे अटक झाली ती जुली वाव्हिलोवा बेपत्ता, जुली नेमकी आहे तरी कोण? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com