VIDEO: मुंबईतील GSB गणेश मंडळाने काढला 400 कोटींचा विमा

GSB Ganesh Mandal: जीएसबीच्या गणपती बाप्पाची नेहमीच चर्चा होत असते. या मंडळाचा गणपती बाप्पा मुंबईकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.

मुंबईतील जेएसबी सेवा मंडळने यावर्षी ४०० कोटींचा विमा काढला आहे. मुंबईमधील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून जीएसबी सेवा मंडाळाच्या गणपतीची ओळख आहे. जीएसबीच्या गणपती बाप्पाची नेहमीच चर्चा होत असते. या मंडळाचा गणपती बाप्पा मुंबईकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या बाप्पाची सर्व आभूषणं सोन्या-चांदीची असतात. जीएसबी गणेशोत्सव मंडळाने या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात महागडा विमा काढल्याची बातमी समोर आली आहे.

जेएसबी सेवा मंडळने घेतलेल्या विम्याची किंमत ४००.५९ कोटी रुपये आहे. या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक, स्वयंसेवक, स्वयंपाकी, सेवा कर्मचारी, पार्किंग आणि सुरक्षा कर्मचारी, स्टॉल कामगार यांचाही या विम्यामध्ये समावेश असेल. सोन्याचे दर वाढल्यामुळे याचा परिणाम विम्याच्या किंमतीवर झाला आहे. ५ दिवसांच्या या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मोठी गर्दी करतात. २०२३ मध्ये या गणेशोत्सव मंडळाने ३६०.४० कोटी रुपयांचा विमा काढला होता. जीएसबी सेवा मंडळ यावर्षी आपला ७० वा वार्षिक गणेशोत्सव साजरा करत आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com