Telegram CEO Pavel Durov : टेलिग्रामच्या CEO ला जिच्यामुळे अटक झाली ती जुली वाव्हिलोवा बेपत्ता, जुली नेमकी आहे तरी कोण? वाचा सविस्तर

Telegram CEO Pavel Durov And Juli Vavilova : टेलीग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक पावेल ड्युरोव यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली. जिच्यामुळे अटक झाली ती जुली वाव्हिलोवा आता बेपत्ता झाल्यामुळे खळबळ माजली आहे.
Telegram CEO Pavel Durov
Telegram CEO Pavel DurovSaam Digital
Published On

टेलीग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक पावेल ड्युरोव यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली. फ्रान्समधील अल्पवयीन मुलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी काम करणारी एजन्सी OFMIN ने त्यांच्यावर फसवणूक, अंमली पदार्थांची तस्करी, सायबरबुलिंग, संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे, जिच्यामुळे पावेल ड्युरोव अचणीत आले ती जुली वाव्हिलोवा आता बेपत्ता झाली आहे.

Telegram CEO Pavel Durov
Deepak Kesarkar : दीपक केसरकरांनी 'दिवे लावले', दुर्घटनेत संधी शोधतायत शिक्षणमंत्री ? नेव्हीवर खापर फोडल्यानं विरोधकांचाही निशाणा

फ्रेंच गोपनीयता डेटा संशोधक बाप्टिस्ट रॉबर्ट यांनी जुलीच्या सोशल मिडिया पोस्टवर भाष्य केलं आहे. रॉबर्ट यांच्या म्हणण्यानुसार, जुलीने पावेल ड्युरोव यांच्यासोबत अज़रबैजानमधील प्रवासाचे दस्तऐवजीकरण सोशल मीडियावर केले होते. ज्यामुळे टेलिग्राम संस्थापकांच्या हालचाली अनवधानाने उघड झाल्या आणि त्यांना अटक होण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. मात्र तिच्या पोस्टमुळेचं अटक झाली का हे सांगणं कठीण आहे, परंतु जर कोणी तिच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवलं असतं, तर सहजपणे दुरोव यांच्या हालचालींचा मागोवा घेता आला असता," असं त्यांनी NY पोस्टला सांगितलं.

बाप्टिस्ट रॉबर्ट यांनी,जुली वाव्हिलोवाच्या सोशल मीडिया आणि X वरिल पोस्टचं संकल केलं आहे. या पोस्टमध्ये तिचा प्रवास आणि पावेल दुरोव यांच्या प्रवासातील काही तथ्य समोर आली आहेत. या पोस्टमधून उझबेकिस्तानमधील दोघांचे एकत्र व्हिडिओ आणि २१ ऑगस्ट रोजी अज़रबैजानमध्ये दुरोव यांच्या कारमध्ये जुली प्रवासी सीटवर बसलेले फोटोंचा देखील समावेळ आहे. अज़रबैजानच्या राजधानीत एकाच शूटिंग रेंज आणि हॉटेलला भेट दिली होती. मात्र त्यांचं नातं जवळचं वाटत असलं तरी, त्यांच्यातील नेमके नातं स्पष्ट होत नाही. ते कधी आणि कसे भेटले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र दोघंही टेलिग्रामचं मुख्यालय असलेल्या दुबईत राहतात.

Telegram CEO Pavel Durov
Dhule News : कान नदीच्या पुरात ४ जण गेले वाहून, पाहा वाहून जातानाचा थरारक VIDEO

दरम्यान पावेल ड्युरोव यांच्या अटकेची वेळ आणि जुली बेपत्ता होण्याची वेळ एकच आहे. त्यामुळे पावेल याच्या अटकेसाठी तिला 'हनी-ट्रॅप' म्हणून वापरले गेले असावे, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. तथापि, अशा कोणत्याही षडयंत्र झाल्याचे ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. दरम्यान टेलिग्राफने, पावेल ड्युरोव लपूनही बसले नव्हते आणि त्यांनी पलायनही केलं नव्हतं. ते नियमितपणे युरोपचा प्रवास करतात आणि त्यांना फ्रान्सचं नागरिकत्वही असल्याचा खुलासा केला आहे. मात्र जुलीच्या बेपत्ता होण्याने या प्रकरणाला एक वेगळ वळण लागलं आहे.

Telegram CEO Pavel Durov
Dhule News : कान नदीच्या पुरात ४ जण गेले वाहून, पाहा वाहून जातानाचा थरारक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com