Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, ४८ लाखांच्या पगाराची नोकरी सोडली; दुसऱ्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS अंजली विश्वकर्मा यांचा प्रवास

Success Story Of IPS Anjali Vishwakarma: अंजली विश्वकर्मा यांनी दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली अन् सरकारी अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस अधिकारी व्हायचे अनेकांचे स्वप्न असते. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी अनेक तरुण दिवसरात्र अभ्यास करतात. काहीजणांनी तर लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. असंच काहीसं अंजली विश्वकर्मा यांच्यासोबत झालं. (Success Story)

अंजली विश्वकर्मा यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडली आणि सरकारी अधिकारी होण्याचे टरवले. अंजली यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. परंतु त्यांनी इंजिनियरिंग केले. त्यांनी जेईई परीक्षा क्लिअर केली आणि त्यांचे आयआयटी कानपूरमध्ये सिलेक्शन झाले. (Success Story Of IPS Anjali Vishwakarma)

२०१५ मध्ये त्यांनी परदेशातील एका कंपनीने नोकरीची ऑफर दिली होती. त्यांना वर्षाला ४८ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले होते. परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली.

दरम्यान, याचकाळात त्यांच्या एका मित्राने जॉब सोडला आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करत होते. अशातच अंजली विश्वकर्मा यांनाही देशसेवा करायची इच्छा झाली. आपल्यामुळे इतर अनेक लोकांना मदत करता येईल, असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली.दुसऱ्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले.

पैसा म्हणजे सर्वकाही नाही, असं अंजली यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी इतरांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सर्वात मोठा मार्ग म्हणजे प्रशासकीय सेवा. प्रशासकीय सेवेतून आपण इतरांना मदत करु असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यात दुसऱ्याच प्रयत्नात त्यांना यश मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

Latur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी लातूर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | VIDEO

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, हिवाळी अधिवेशनात मिळणार कर्जमाफीची मोठी भेट? सरकारकडून हालचालींना वेग

Gaurav More: फिल्टरपाडा ते आलिशान टॉवर; गौरव मोरेला मिळाली म्हाडाच्या नव्या घराची चावी

Navratri Day 5: आजच्या दिवशी स्कंदमाता देवीला कमळाचे फूल अर्पण करा, तुमच्या इच्छा- आकांक्षा होतील पूर्ण

SCROLL FOR NEXT