Credit Card  Saam Tv
बिझनेस

Free Cinema Ticket: चित्रपट पाहण्याचा छंद आहे? मग 'हे' पाच क्रेडिट कार्ड देतील मोफत सिनेमाचं तिकीट

Bharat Jadhav

Free Cinema Ticket On Credit Cards :

तुम्हाला चित्रपट पाहण्याचा छंद आहे का? आहे, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड, असो टॉलिवूड इंडस्ट्रीजमध्ये दमदार कलाकृती बनत आहेत. मोठं-मोठ्या बॅनरचे सिनेमे रिलीज होत आहेत. अ‍ॅनिमल असो, लिओ असो किंवा टायगर-३, असे दमदार आणि अ‍ॅक्शन पॅक मुव्ही तुमच्याकडून मिस होणार नाहीत. विशेष म्हणजे सिनेमा पाहण्यासाठी पैसे मोजण्याची सुद्धा गरज राहणार नाहीये. हो, बरोबर तुम्ही बरोबर वाचलं. तुम्ही या सिनेमांचे तिकीट घेऊ शकणार आहात. (Latest News)

आता चित्रपट पाहण्यासाठी पैसे भरण्याची गरज नाहीये. अनेक बँका आहेत, ज्या आपल्या ग्राहकांना मोफत सिनेमा तिकीट देण्याची सुविधा देत आहेत. पण फक्त तुमच्याकडे त्या बँकांचे क्रेडिट कार्ड असणं आवश्यक आहे. या बँकांच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला फक्त मोफत तिकीटचं नाहीतर कॅशबॅक, डिस्काउंट आणि इतर अनेक आकर्षक गिफ्ट्स मिळतील.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

HDFC Bank च्या क्रेडिट कार्डवर काय मिळेल सुविधा

Bookmy show च्या माध्यमातून तुम्ही सिनेमांच्या तिकीट घेतल्यास तुम्हाला त्यावर २५ टक्के सूट मिळू शकते. दरम्यान एक कार्डधारक एका महिन्यात प्रति कार्डवर जास्तीत जास्त ४ या सिनेमांचे तिकीट घेऊ शकतो. कार्डधारकाला प्रत्येक व्यवहारावर ३५० रुपयांची सूट मिळू शकते. यासह फळं आणि इतर किराणा खरेदीवर ५० रुपयांची सूट देखील मिळते.

जेव्हा तुम्ही इझी डिनरवर PayEazy च्या माध्यामातून एचडीएफसी बँकच्या टाइम्स कार्ड क्रेडिट कार्डचा उपयोग करून बिल दिल्यास त्यात १० टक्क्यांचा डिस्काउंट मिळू शकतो. एका वर्षात १,५०,००० रुपये खर्च केल्यास रिन्यूअल मेंबरशीपचं शुल्क आपल्याला माफ होतं.

State Bank Of India च्या क्रेडिट कार्डवर काय आहे सुविधा

या बँकेच्या क्रेडिट कार्डवर देखील अनेक फायदे मिळत असतात. डायनिग, सिनेमा, डिपार्टमेंटल स्टोअर, आणि किराणा खर्चावर प्रति १५० रुपयांवर १० रिवॉर्ड पॉइंट मिळत असतात. यासह इतर कोणत्याही खर्चावर तुम्ही १५० रुपये खर्च केले तर एक रिवॉर्ड पॉइंट मिळत असतो. ( ४ रिवॉर्ड पॉइंट म्हणजे - एक रुपया)

चित्रपटांच्या तिकीटावरील ऑफर फक्त www.BookMyShow.com वरून तिकीट घेतल्यास मिळते. तिकिटांचा दर ५०० रुपये असेल किंवा दोन तिकीट घेणार असाल तर ते कमी करू दिलं जातं. वार्षिक शुल्क - ४,९९९ रुपये आहे तर रिन्यूअल शुल्क दुसऱ्या वर्षाला ४,९९९ रुपये.

कोटक बँक महिंद्रा बँक (पीव्हीआर कोटक गोल्ड क्रेडिट कार्ड)चे फायदे

महिन्याच्या पेमेंट चक्रादरम्यान १०,००० रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला असेल तर पीव्हीआर मुव्ही तिकीट मिळू शकतं. फ्री पीव्हीआर मुव्ही तिकीट मिळवण्यासाठी पीव्हीआर क्रेडिट कार्डचा उपयोग करू शकता. या कार्डच्या माध्यमातून तुम्ही देशभरात कुठेही खरेदी करू शकतात. या कार्डमार्फत मिळणारं तिकीट तुम्ही कधीही, केव्हाही, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही शोचं घेऊ शकतात.

इतकेच नाही तर पीव्हीआरच्या खाद्य आणि पेय पदार्थांवर १५ टक्के कॅशबॅक मिळू शकता. तसेच पीव्हीआर बॉक्स ऑफिसवर घेतलेल्या तिकीटावर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर कोणत्याच प्रकारची ज्वॉइनिंग शुल्क नाहीये.

ICICI Bank च्या क्रेडिट कार्डचे फायदे

सलग चार वेळा एक तिकीट घेतल्यास एक तिकीट फ्री मिळते. एका महिन्यात कमीत- कमी २ तिकीट घेतल्यास १०० रुपये म्हणजेच २५ टक्क्यांची सूट मिळते. BookMyShowवर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. BookMy Show वरील लाभ घेण्यासाठी आठवड्यातील कोणत्याही दिवशी, दररोज असलेली उपलब्धतानुसार जो आधी येईल त्याला आधी या नियमाप्रमाणे ही सुविधा मिळत असते.

याच बँकेच्या सॅफिरो क्रेडिट कार्डचे फायदे

एका महिन्यात २ वेळा सिनेमाचं तिकीट घेतलं तर तुम्हाला एक तिकीट फ्री मिळतं. एका महिन्यात कमीत-कमी २ तिकीट घेतल्यास १०० रुपये म्हणजेच २५ टक्क्यांची सूट मिळते. BookMyShowवर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. BookMyShowसाठी आठवड्यातील कोणत्याही दिवशी, दररोज असलेली उपलब्धतानुसार जो आधी येईल त्याला आधी मिळेल या प्रमाणे ही सुविधा मिळत असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT