Ford Endeavour Google
बिझनेस

Ford Endeavour: मस्कूलर लूक, 10 गीअर्स; जबरदस्त फीचर्ससह नवीन कारसोबत Ford पुन्हा भारतात परतणार परतणार

Ford Endeavour Price: फोर्ड ही नावाजलेली वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनी बऱ्याच वर्षानंतर भारतात Ford Endeavour कार लाँच करणार आहे. ही कार आकर्षक लूक आणि जबरदस्त फिचरसह लाँच होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ford Endeavour Features And Specification:

फोर्ड ही नावाजलेली वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनीची फोर्ट एव्हेंडर कारने बाजारात चांगली विक्री केली नसली तरी ही कार सर्वांच्याच लक्षात आहे. या कारची क्रेझ भारतीय बाजारपेठेत दिसली आहे. कंपनीची ही कार २०२१ पासून भारतीय बाजारपेठेत दिसली नव्हती.

कंपनीची ही नवीन कार भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फोर्ड एंडेव्हर २०२५ मध्ये बाजारात पुन्हा लाँच केली जाऊ शकते. कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही आहे. (Latest News)

फोर्डने भारतात कारचे उत्पादन बंद केल्यानंतर अनेक वाहन उत्पादन कंपन्यानी फोर्डच्या प्लांटवर लक्ष केंद्रित केले होते. अनेक कंपन्यांनी ही प्लांट खरेदी करण्याचे प्लानिंग केले होते. मात्र, फोर्डने आपला चैन्नईतील प्लांट न विकण्याचा निर्णय घेतला. कंपनी हा प्लांट विकण्याचा पुनर्विचार करत आहे. जेणेकरुन कंपनीच्या कार निर्यातीसाठी आणि भारतीय बाजारपेठेत परत येण्यासाठी फायदेशीर ठरेल.

फोर्ड कंपनीने भारतात उत्पादन बंद केले असले तरी नेपाळमध्ये कारची विक्री सुरु आहे. कंपनीने अलीकडेच नेपाळमध्ये फोर्ड एव्हरेस्ट कार लाँच केली आहे. या कारची किंमत २,४०,००,००० NPR आहे. फोर्ड एव्हेंडर कार नेपाळसह इतर काही भागांमध्ये एव्हरेस्ट या नावाने विकली जात आहे. कंपनी या कारला भारतीय बाजारपेठेत नवीन एव्हेंडर म्हणून लाँच करु शकते. या एसयूव्हीच्या नवीन मॉडेलमध्ये फार काही बदल करण्यात आलेला नाही.

कंपनीची ही नवीन कार पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. या कारचा लूक आणि डिझाइन खूप खास आहे. ही कार पूर्वीच्या फोर्ड एंव्हेडरपेक्षा खूप चांगली आहे. या कारच्या पुढील बाजूस मोठा मस्क्युलर बंपर, क्रोम अॅक्सेंटसह आकर्षक लूक आहे. या कारची लूक खूपच छान आहे. कंपनीने या कारमध्ये २०-इंच अॅलॉय व्हील्स देण्यात आले आहे.

फोर्ड एव्हरेस्ट कारचे इंटेरियर खूप चांगले आहे. कंपनीने यात १२ इंचाची व्हर्टिकल टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ३६० डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. कारमध्ये जगातील पहिला १०-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स आणि तीन ड्रायव्हिंग मोड देण्यात आला आहे. ही एसयूव्ही कोणत्याही हवामानात आणि रस्त्यावर सहज धावू शकेल, असा कंपनीने दावा केला आहे.

कंपनीने कारमध्ये २.० लिटर क्षमतेचे इको-ब्लू-टर्बो डिझेल दिले आहे. जे 210PSपॉवर आणि 500NM टॉर्क जनरेट करते. हे इंजिन १०-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही कार भारतात फोर्ड एव्हेंडर म्हणून सादर केली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT