Forbes Richest List 2024, India Richest Person  Saam Tv
बिझनेस

Forbes Richest List 2024 : श्रीमंतांच्या यादीत भारतात मुकेश अंबानी 'नंबर वन',गौतमी अदानी दुसऱ्या स्थानावर; टॉप 10 भारतींयांची लिस्ट पाहा

India Richest Person : फोर्ब्सच्या २०२४ च्या जागतिक अब्जाधीश २०२४ च्या यादीत २०० भारतीयांचा समावेश आहे. मागच्या वर्षी १६९ चा आकडा होता. या भारतीयांची एकूण संपत्ती ही $954 अब्ज आहे. मागच्या वर्षी $675 बिलियन वरून ४१ टक्के जास्त झाली आहे.

कोमल दामुद्रे

Forbes 2024 India's Richest List :

फोर्ब्सच्या २०२४ च्या जागतिक अब्जाधीश २०२४ च्या यादीत २०० भारतीयांचा समावेश आहे. मागच्या वर्षी १६९ चा आकडा होता. या भारतीयांची एकूण संपत्ती ही $954 अब्ज आहे. मागच्या वर्षी $675 बिलियन वरून ४१ टक्के जास्त झाली आहे.

श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर असून त्यांची$83 अब्ज वरून $116 अब्ज झाली आहे, ज्यामुळे $100 बिलियन क्लबमध्ये प्रवेश करणारे ते पहिला आशियाई बनले आहे. मुकेश अंबानी यांनी आपले स्थान श्रीमंतांच्या यादीत कायम राखले आहे. मुकेश अंबानी हे जगात नवव्या क्रमांकवर तर भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

श्रीमंतांच्या यादीनुसार गौतम अदानी हे दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांची यापूर्वी संपत्ती ही $36.8 अब्ज इतकी होती. तर सध्या त्यात वाढ झाली आहे. एकूण संपत्ती ही $84 अब्ज इतकी असून जगात ते १७ व्या स्थानावर आहे. स्त्रियांच्या यादीत भारतातील सगळ्यात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल आहे. भारतात त्या चौथ्या क्रमांकाच्या यादीत आहे. वर्षभरापूर्वी त्या सहाव्या क्रमांकावर होत्या.

श्रीमंतांच्या यादीत नरेश त्रेहान, रमेश कुन्हीकन्नन आणि रेणुका जगतियानी यांचाही समावेश आहे. तर बायजू रवींद्रन आणि रोहिका मिस्त्री यांचे नाव वगळण्यात आले आहे. पाहूयात टॉप 10 भारतीयांची लिस्ट.

  • मुकेश अंबानी (Mukesh Ambani)- $116 अब्ज संपत्ती

  • गौतम अदानी (Gautam Adani) - $84 अब्ज संपत्ती

  • शिवा नाडर- $36.9 अब्ज संपत्ती

  • सावित्री जिंदाल- $33.5 अब्ज संपत्ती

  • दिलीप संघवी- $26.7 अब्ज संपत्ती

  • सायरस पूनावाला- $21.3 अब्ज संपत्ती

  • कुशल पाल सिंग- $20.9 अब्ज संपत्ती

  • कुमार बिर्ला - $19.7 अब्ज संपत्ती

  • राधाकिशन दमाणी- $17.6 अब्ज संपत्ती

  • लक्ष्मी मित्तल- $16.4 अब्ज संपत्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT