Farmer ID Saam Tv
बिझनेस

Farmer ID: पिक विम्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य! कसं काढायचं ? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Farmer ID Registration Process: सरकारने पिक विम्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान, पिक विमा अर्ज करताना फार्मर आयडी महत्त्वाचा आहे. फार्मर आयडी कसा काढायचा याबाबत स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या.

Siddhi Hande

खरीप हंगाम 2025-26 साठी राज्य शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी 31 जुलै 2025 पर्यंत विमा काढता येणार आहेत. तर पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना ही पीक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलाय, दरम्यान या हंगामातील वेगवेगळ्या पिकांसाठी देण्यात येणारी विमा संरक्षित रक्कम देखील घोषित करण्यात आली आहे. पिक विमा अर्ज करताना फार्मर आयडी हा खूप महत्त्वाचा असतो. तर हा फार्मर आयडी कसा काढायचा? याबाबत सर्व माहिती वाचा.

फार्मर आयडी कसं काढायचं? (How To Get Framer ID)

  • सर्वात आधी https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या वेबसाइटवर जायचं आहे.

  • यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यातील लॉग इन अॅज फार्मरवर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला Create New User वर क्लिक करायचे आहे.यानंतर आधार नंबर टाकायचा आहे.

  • यानंतर ओटीपी टाकून सबमिट करा. यानंतर तुमचं नाव आणि सर्व माहिती भरायची आहे. KYC माहिती भरा.

  • यानंतर तुम्हाला Agristack link येथे नंबर टाकायचा आहे.यानंतर ओटीपी येईल तो वेरिफाय करा.

  • यानंतर पासवर्ड टाका आणि अकाउंट अॅक्टिव्हेट करा.

  • यानंतर तुम्हाला पुन्हा फोन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे.

  • यानंतर केवायसी ओपन होईल त्यात सर्व माहिती भरा.

  • यानंतर तुमचा रहिवासी पत्ता टाका.यानंतर Land Holder Details असा ऑप्शन येईल. त्यात Owner असं निवडायचं आहे.

  • यानंतर तुम्हाला व्यवसायाची माहिती विचारली जाईल. त्यात शेती आणि शेतजमिनीचा मालक सिलेक्ट करा.

  • यानंतर तुमच्या जमिनीची माहिती, गट क्रमांक आणि खाते क्रमांक टाकायचा आहे.यानंतर तुमच्या जमिनीची माहिती समोर उपलब्ध होईल.

  • land Type मध्ये जाऊन शेती हा पर्याय निवडा.यानंतर तुमची माहिती टाकायची आहे.

  • यानंतर Verify All Land वर क्लिक करा. त्यानंतर महसूल विभागाचे अप्रुवल असा पर्याय येईल. त्यात Revenue ऑप्शनवर क्लिक करा.

  • यानंतर सर्व अटी मान्य करा. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका. तुमच्या फोनवर ओटीपी येईल.यानंतर तुमची नोंदणी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस; रिंकू राजगुरू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन

ठाकरे बंधू फक्त ५ तारखेपर्यंतच एकत्र? राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यानं सांगितली पुढची रणनीती| VIDEO

SCROLL FOR NEXT