Shindkheda Crime
Shindkheda CrimeSaam tv

Shindkheda Crime : पत्नीच्या अपघाती मृत्यूचा बनाव; पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर

Dhule News : सुनीताबाई भिल छतावरून कोसळल्याने जखमी झाल्याचे पती उदय भिल याने सांगितले. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला होता. तर नरडाणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
Published on

चिमठाणे (धुळे) : पत्नी छतावरून पडल्याने तिला डोक्याला गंभीर मार लागला. उपचारासाठी दाखल केले असता पत्नीचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव पतीने केला होता. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली असून पतीचा कारनामा देखील समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.

धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील दसवेल येथे हि धक्कादायक घटना घडली आहे. सुनीताबाई उदय भिल (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान २५ जूनला सकाळी उदय मुरलीधर भिल (वय ४९) व त्यांची पत्नी सुनीताबाई भिल यांच्यात लग्नात आहेराचे पैसे देण्यावरून भांडण झाले. संतापाच्या भरात उदयने सुनीताबाई हिच्या डोक्यावर लाकडी टिपर मारले. डोक्यास जबर मार लागल्याने त्या जखमी झाल्या होत्या. 

Shindkheda Crime
Virar Crime : सोसायटीतील सोलर पॅनल बसविण्यावरून वाद; रेल्वे कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

शवविच्छेदन अहवालावरून आला संशय 

यानंतर उदय भिल याने सुनीताबाईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पत्नी सुनीताबाई भिल छतावरून कोसळल्याने जखमी झाल्याचे पती उदय भिल याने सांगितले. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला होता. तर नरडाणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांचा संशय बळावला. 

Shindkheda Crime
Buldhana : बस गावात न आणता विद्यार्थ्यांना रस्त्यावरच उतरवले; संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर अडविल्या बस

अखेर पतीनेच हत्या केल्याचे आले समोर 

यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले. यानंतर पोलिस निरीक्षक मोरे यांनी घटनेमागील सत्य शोधून काढत पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. तर सुनीताबाई भिल यांचा भाऊ अनिल मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नरडाणा पोलिस ठाण्यात उदय भिल याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com