Buldhana : बस गावात न आणता विद्यार्थ्यांना रस्त्यावरच उतरवले; संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर अडविल्या बस

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद ते नांदुरा रोड वरील येरळी येथील जुन्या पुलावरून एसटी बस न जाता नवीन पुलावरून जात आहेत. त्यामुळे मानेगाव व येरळी मधील विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते नांदुरा या मार्गावर विद्यार्थ्यांना रस्त्यावरच एसटी बसमधून उतरविले जात असते. यामुळे संतप्त झालेल्या गावकरी आणि विद्यार्थ्यांनी आज मार्गावरील एसटी बस अडवून आंदोलन सुरू केले. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. तसेच बस रोखून धरल्याने बसमधील प्रवाशांना देखील ताटकळत बसावे लागले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद ते नांदुरा रोड वरील येरळी येथील जुन्या पुलावरून एसटी महामंडळच्या बस न जाता नवीन पुलावरून जात आहेत. त्यामुळे मानेगाव व येरळी मधील विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे. शाळा, महाविद्यालयातून येणारे विद्यार्थी बसमधून येत असल्याने विद्यार्थ्यांना रात्री उशीरा रस्त्यावर उतरवले जाते. यामुळे रात्रीच्या अंधारातच विद्यार्थ्यांना गावापर्यंत जावे लागत असते. 

Buldhana News
Nashik : करन्सी नोट प्रेस भरती परीक्षेसाठी डमी परीक्षार्थीं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार, ७ जणांवर गुन्हा दाखल

महामार्गावरून जाणाऱ्या बस अडविल्या 

यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचा धोका निर्माण झालेला आहे. मागील काही दिवसांपासून बस चालक- वाहकांकडून होत असलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. परिणामी मानेगाव व येरळी येथील नागरिकांनी आज या मार्गावरून जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या सर्व बसेस रोखून धरल्या होत्या. बस चालक व वाहकांच्या मनमानी कारभाराबाबत रोष व्यक्त करत बस पूर्वीप्रमाणे नेण्याची मागणी करण्यात येत आहे. 

Buldhana News
Virar Crime : सोसायटीतील सोलर पॅनल बसविण्यावरून वाद; रेल्वे कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

आश्वासनंतर आंदोलन मागे 

दरम्यान घटनेची माहिती पोलीस प्रशासन व आगार व्यवस्थापकाला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून गावकरी व विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यावर चर्चा करत सर्व बसेस विद्यार्थ्यांच्या व गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावातून पाठवल्या जाईल; असे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com