भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) बनावट कॉल्सवर नियंत्रण ठेवले नाही, म्हणून दूरसंचार कंपन्यांना आतापर्यंत ११० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सध्या लोकांना अनोळखी नंबरवरून कॉल येत आहेत, त्यापैकी बहुतांश मार्केटिंग कॉल्स (Fake Call) आहेत. हे थांबवण्यासाठी ट्रायने कठोर पावले उचलली आहेत. (Latest News)
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने भारतातील नामांकित दूरसंचार कंपन्यांवर कारवाई केलीय. देशभरातील फोन वापरकर्ते बनावट कॉलमुळे हैराण झाले आहेत. ट्रायने दूरसंचार कंपन्यांना अनेक वेळा असे कॉल्स (Spam Calls) थांबवण्याचा इशारा दिला होता, परंतु कंपन्या तसं करण्यात अपयशी ठरल्या आहेत. दूरसंचार नियामकाने आतापर्यंत या कंपन्यांना 110 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनोळखी नंबरवरून येणारे बनावट कॉल ही भारतातील एक मोठी समस्या आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
टेलिकॉम कंपन्यांवर कारवाई
TRAI ने वारंवार टेलिकॉम कंपन्यांना हे कॉल्स थांबवण्यासाठी पावले उचलण्यास सांगितलं आहे. काही विपणन कंपन्या टेलीमार्केटिंग क्रमांकांऐवजी सामान्य फोन नंबरद्वारे संपर्क साधतात. लोकांना वाटतं की, हा एक ओळखीचा कॉल आहे, परंतु प्रत्यक्षात हे बनावट टेलीमार्केटिंग नंबर (Unknown Number Spam Calling) आहेत. सध्या टेलिकॉम ऑपरेटर अशा कॉल्सवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहेत.
११० कोटी रुपये दंड
दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या चुकांचा फटका सहन करावा लागला आहे. त्यांच्यावर आतापर्यंत ११० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. देशात तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. यात रिलायन्स जिओ (Jio), भारती एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) यांचा समावेश आहे. याशिवाय सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे देखील मोठ्या प्रमाणात वापरकर्ते आहेत. कोणत्या टेलिकॉम कंपनीला किती दंड ठोठावण्यात आलाय, हे आतापर्यंत स्पष्ट झालं नाही.
बनावट कॉल्सवर कारवाई
कठोर कारवाई करत ट्रायने ७४,००० हून अधिक मोबाईल फोनचे कनेक्शन तोडले आहेत. मात्र, तरीही लोकांना बनावट कॉलचा त्रास होत आहे. दररोज या कॉलचा सरासरी आकडा २० लाखांहून अधिक (fine To telecom companies) आहे. दरम्यान, दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सुमारे ८ लाख दूरसंचारकर्त्यांची आउटगोइंग सेवा मर्यादित केली आहे.
ट्राय ॲपवर तक्रार करा
TRAI ने ११ लाखांहून अधिक टेलीमार्केटर्सना नोटीस पाठवल्या आहेत. त्याच वेळी, २ लाख क्रमांकांवर आउटगोइंग सेवा ६ महिन्यांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) देखील वापरला जात आहे. AI द्वारे ३० लाख एसएमएस आणि सुमारे २ लाख एसएमएस टेम्पलेट्स काढले गेले आहेत. जर तुम्हालाही बनावट कॉल्सचा त्रास होत असेल, तर ट्रायच्या ॲप TRAI DND 3.0 (डू नॉट डिस्टर्ब) वर नक्कीच तक्रार करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.