ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल स्पॅप कॉल्समुळे सर्वच युजर त्रस्त झालेले पाहायला मिळतात.
दिवसांतून एकदा तरी स्पॅम कॉलशी प्रत्येकाची गाठ पडलेली असते.
कॉल्स कोणत्याही बँकेतून किंवा कंपनीतून येतात. आवश्यक कामांवेळीच असे कॉल येत असतात. त्यामुळे त्रास हा होतोच
कोणता कॉल स्पॅम आहे हे पाहण्यासाठी Android आणि iOS डिव्हाइसमध्ये पर्याय उपलब्ध आहे. तसेच, त्यांना ब्लॉक करण्याची परवानगी देखील आहे.
फोनच्या सेटिंगमध्ये Caller ID and Spam फीचर शोधावे लागेल. जो फोन कॉल मिळवल्यानंतर स्क्रीनवर कॉलर आणि स्पॅम आयडी असे दर्शवतो.
फोनमधील Filter Spam Calls ऑप्शनला इनेबल केल्यानंतर संशयित स्पॅम कॉल्स तुम्हाला येणार नाहीत.
हे अॅप फक्त त्याच कॉलर्सला स्पॅमच्या रूपात मानतो. ज्याला अन्य गुगल डायलर यूजर्सकडून स्पॅम चिन्ह मिळाले आहे.