मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये मुलींना आर्थिक मदत केली जाते. सरकारने मुलींसाठी अशीच एक योजना राबवली आहे ज्यात मुलींना ७५००० रुपये मिळतात. या योजनेत मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. (Kanya Sumangala Yojana)
कन्या सुमंगला योजनेत मुलींना मदत केली जाते. ही योजना उत्तर प्रदेश सरकारने चालवली आहे. या योजनेत मुलींचे शिक्षण, स्वास्थ आणि लग्नासाठी आर्थिक मदत केली जाते. मुलींचे भविष्य उज्जवल करावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेत मुलींना सहा मुख्य कॅटेगरीअंतर्गत लाभ मिळतो. ज्या मुलींचा जन्म १ एप्रिल २०२९ नंतर झाला आहे. त्यांना ५००० रुपये एकरकमी दिले जातात. हे पैसे मुलींच्या आईवडिलांना दिले जातात. त्यानंतर जेव्हा मुलीचे पहिले लसीकरण होते तेव्हा तिला २००० रुपये दिले जातात.
या योजनेत शिक्षणासाठी महिलांना आर्थिक मदत केली जाते. यामध्ये मुलगी वेगवेगळ्या इयत्तांमध्ये जाईल. तेव्हा तिला पैसे दिले जातील. तुमची मुलगी पहिलीला गेल्यावर तिला ३००० रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी सहावी आणि नववीत गेल्यावर तिला ३००० रुपये दिले जातात. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते. (Kanya Sumangala Yojana For Girls)
हाय स्कूल आणि इंटरमीडिएटचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यावर सरकारी मदत केली जाते. यासाठी मुलींना त्यांचा फोटो, प्रमाणपत्र, निवास प्रमाण पत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करतात.अॅडमिशनची माहिती, प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. या योजनेसाठी तुम्ही कन्या सुमंगला योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी मुलीच्या अॅडमिशनची माहिती देणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.