EPFO Rule Saam Tv
बिझनेस

EPFO Withdrawal Rule: रिटायरमेंटआधी कोणत्या कारणांसाठी काढू शकतात PFचे पैसे; वाचा EPFO चे नियम

EPFO Withdrawal Reasons: प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. दर महिन्याला पीएफ अकाउंटमध्ये रक्कम जमा केली जाते. ही एक गुंतवणूक असते. तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत हे पैसे काढू शकतात.

Siddhi Hande

EPFO चे नियम

कोणत्या कारणासाठी काढू शकतात पीएफ खात्यातील पैसे

शिक्षणासाठी, मेडिकल इमरजन्सी आणि लग्नासाठी काढू शकतात पैसे

प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. कर्मचाऱ्याच्या पगारातील ठरावीक रक्कम दर महिन्याला पीएफ खात्यात जमा केली जाते. दरम्यान, पीएफमधील रक्कम ही एक गुंतवणूक असते. पीएफ खात्यात कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही १२ टक्के योगदान करतात. दरम्यान, ईपीएफओवर चांगले व्याजदर दिले जाते. हे पैसे सेवानिवृत्तीनंतर मिळतात. परंतु तुम्ही त्याआधीही हे पैसे काढू शकतात.

तुम्ही काही परिस्थितींमध्ये सेवानिवृत्तीआधीही पीएफमधील पैसे काढू शकतात. ईपीएफ अॅडव्हान्स काढण्यासाठी काही नियम आहेत. त्याचे पालन करुनच तुम्ही पैसे काढू शकतात.

कोणत्या कारणासाठी काढू शकतात पीएफचे पैसे (EPFO PF Withdrawal Reasons)

मेडिकल एमरजन्सीसाठी काढू शकणार पैसे

तुम्ही एखाद्या मेडिकल इमरजन्सीसाठी पैसे काढू शकतात. कोणताही ईपीएफओ सदस्य पैसे काञू शकतात. यामध्येही काही वर्षे काम केले असल्याची अट निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये कर्मचारी, त्यांचा जोडीदार, मुले आणि आई वडिलांच्या उपचारासाठी पैसे काढू शकतात.

मुलांच्या शिक्षणासाठी

मुलांच्या शिक्षणासाठीही तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकतात. यासाठी १०वीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर पैसे काढू शकतात. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या जमा रक्कमेच्या आधारावर व्याज दिले जातात.

लग्नासाठीही काढू शकतात पैसे

ईपीएफओ सदस्य स्वतः चे लग्न, मुलांचे किंवा भाऊ-बहिणीच्या लग्नासाठी पैसे काढू शकतात. यामध्ये कर्मचाऱ्यांनी गुंतवलेली रक्कम आणि त्यावर मिळालेले ५० टक्के व्याज काढू शकतात.

घर खरेदी किंवा बांधकामासाठी

तुम्ही जर स्वतः चे घर घेण्याचा विचार करत असाल किंवा घराचे बांधकाम करायचे असेल तर हे पैसे काढू शकतात.यामुळे तुम्हाला आर्थिक मदत होईल.

रिटायरमेंट

तुम्ही रिटायरमेंटनंतर पीएफ खात्यातील सर्व पैसे काढू शकतात. याचसोबत तुम्ही ५४ वर्षानंतरही पैसे काढू शकतात.

बेरोजगार

जर कर्मचारी बेरोजगार असेल तर त्याला पीएफचे पैसे काढता येतात. जर कर्मचारी दोन महिन्यांसाठी बेरोजगार असेल तर तो पीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम काढू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Border 2: 'बॉर्डर २'च्या शेवटी प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज; धुरंधरची होणार जबरा एन्ट्री

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेसेना एकत्र येण्याची शक्यता

Mumbai : मुंबईमध्ये जोरदार राडा, भाजप कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, डोक्यावर भयंकर वार, व्हिडिओ व्हायरल

Bihar Bhawan: मुंबईत तयार होणार बिहार भवन, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटींचा खर्च; फायदा नेमका कुणाला होणार?

High Cholesterol Symptoms: सावधान! थंडीत ही 5 लक्षणे अजिबात दुर्लक्षित करु नका, असू शकतो उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका

SCROLL FOR NEXT