EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO: नवीन नोकरी जॉइन केली अन् PF अकाउंट ट्रान्सफर केलं नाही? होऊ शकतं मोठं नुकसान

PF Account Transfer: जर तुम्ही नोकरी सोडली अन् नवीन नोकरी जॉइन केली असेल तर तुम्हाला पीएफ अकाउंट ट्रान्सफर करणे गरजेचे आहे. जर तुम्ही अकाउंट ट्रान्सफर केले नाही तर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.

Siddhi Hande

प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे पीएफ अकाउंट हे असते. ईपीएफओद्वारे पीएफ अकाउंट चालवले जाते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा केली जाते. यातील काही रक्कम तुम्हाला पेन्शन स्वरुपात सेवानिवृत्तीनंतर दिली जाते. कंपनीद्वारे पीएफ अकाउंट उघडले जाते. परंतु तुम्ही जर नोकरी सोडली आणि दुसरी नोकरी जॉइन करणे खूप गरजेचे आहे.

जर तुम्ही जुन्या कंपनीतून पीएफ अकाउंट दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर केले नाही तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होईल.

जर तुम्ही पीएफ अकाउंट ट्रान्सफर केले नाही तर इनअॅक्टिव पीएफ अकाउंटवर व्याजदर मिळणे काही वर्षानंतर बंद होते. यामुळे तुम्हाला व्याज मिळणार नाही.

PF ट्रान्सफर केला नाही तर काय होणार

पीएफमधील गुंतवणूक ही फायद्याची असते. पीएफवर इन्कम टॅक्स सूट मिळते. त्याचसोबत चांगले व्याजदरदेखील मिळते. तुम्ही जर नोकरी बदलल्यावर पीएफ अकाउंट ट्रान्सफर केले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकतात. तुम्हाला असं वाटतं असेल की, अकाउंट ट्रान्सफर केले नाही तरीही त्यावर व्याजदर जमा होईल. तर असं होत नाही. यासाठी काही ठरावीक काळाची मर्यादा आहे.

पीएफ अकाउंट ट्रान्सफर कसं करायचं?

जर कर्मचाऱ्याने नवीन नोकरी जॉइन केली तर आपोआप पीएफ अकाउंट ट्रान्सफर होत नाही. कर्मचाऱ्याला स्वतः ईपीएफच्या वेबसाइटवर जाऊन सर्व प्रोसेस करावी लागेल. पीएफ अकाउंटमधील यूएएन नंबर हा सेम असतो.

जुन्या पीएफ अकाउंटवर किती दिवसांपर्यंत मिळणार व्याजदर?

जुन्या पीएफ अकाउंटवर व्याज मिळणार आहे. परंतु यासाठी काही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही ३६ महिने म्हणजे ३ वर्षांपर्यंत या अकाउंटमध्ये कोणतीही रक्कम जमा केली नाही तर तुमचे अकाउंट निष्क्रिय केले जाणार आहे. यानंतर तुम्हाला या अकाउंटवर व्याजदर मिळत नाही.

जुन्या पीएफ अकाउंटमधील योगदान बंद झाल्यावर तुम्हाला चक्रव्याढ व्याजदेखील मिळणार नाही. याचसोबत जर तुम्ही आधार, बँक अकाउंटची माहिती अपडेट केली नाही तर पैसे काढण्यासाठीही अडचणी येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT