EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO Update : ...तर या ईपीएफओ कर्मचाऱ्यांचे खाते होणार बंद; मिळणार नाहीत पैसे

EPFO Update: ईपीएफओ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता जर ३६ महिन्यापर्यंत तुमच्या खात्यात एकही ट्रान्झॅक्शन झाले नाही तर तुमचे खाते निष्क्रिय केले जाणार आहे.

Siddhi Hande

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

या कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते होणार बंद

हे काम लगेच करा अन्यथा पीएफ खात्यात मिळणार नाही व्याज

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (EPFO) व्याजदर निश्चित करण्यात आले आहे. २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी ८.२५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आहे. ईपीएफओवर सर्वाधिक व्याजदर मिळते.दर वर्षी काही ठरावीक काळानंतर व्याजदर खात्यात जमा केले जाते. दरम्यान, व्याजाच्या कॅल्क्युलेशनवर दर महिन्याला व्याजदर दिले जाते. वर्षातून एकदाच ईपीएफ खात्यात पैसे जमा केले जातात.

दरम्यान, जर तुमची नोकरी गेली असेल किंवा तुम्ही पीएफ खात्यात पैसे जमा केले नाही तर तुमचे खाते बंद होऊ शकते. दर लगातार ३६ महिने तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. तुमचे खाते निष्क्रिय असेल. त्यात कोणतेही ट्रान्झॅक्शन झाले नाही तर त्यावर व्याजदरदेखील बंद केले जाईल. ५५ वर्षात रिटायरमेंट घेतल्यानंतर फक्त ३ वर्षे खाते सक्रिय राहते. त्यानंतर हे खाते बंद केले जाते.

५८ व्या वर्षी ईपीएफओ खाते बंदल केले जाते. दरम्यान, नोकरी बदलल्यानंतर तुम्हाला ईपीएफ खाते ट्रान्सफर करणे गरजेचे आहे. जर तुम्ही नोकरीला नसाल तर ईपीएफ खात्यात पैसे काढून घेतले पाहिले.

EPFO ने सोशल मीडियावरुन दिली माहिती

ईपीएफओने सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली आहे. जर तुमच्या खात्यात ३६ महिन्यात ट्रान्झॅक्शन झाले नाही तर तुमच्या खात्यात व्याज मिळत नाही. जर तुम्ही नवीन नोकरी जॉइन केली असेल तर खाते ट्रान्सफर करुन घ्या. जर तुम्ही नोकरी करत नसाल तर पैसे काढून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Street lights and health: रस्त्यांवरील दिव्यांचा प्रकाश घरात येतोय? स्ट्रीट लाइटमुळे हृदयाच्या समस्या वाढत असल्याचं संशोधनातून समोर

Amravati Airport : मुंबईसाठी उड्डाण पुन्हा सुरु; आठ दिवसांपासून बंद होती विमानसेवा

Manoj jarange patil protest live updates : पंढरपुरातून मराठा आरक्षण आंदोलनकांना मदत

iPhone Battery Hacks: आयफोन यूजर्ससाठी खास ट्रिक! बॅटरी बॅकअप वाढवायचा आहे? करा 'ही' सेटिंग आणि वाचवा बॅटरी

Priya Marathe Death: 'मला वडील नाहीत, माझे वडील बनाल...'; प्रिया मराठेसाठी विजू मानेंची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

SCROLL FOR NEXT