PF Withdrawal: पीएफ काढण्याची प्रोसेस झाली आणखी सोपी; कोणत्याही कागदपत्राशिवाय काढता येणार पैसे

PF Withdrawal Online Process: पीएफमध्ये दर महिन्याला काही ठरावीक रक्कम गुंतवली जाते. ही रक्कम तुम्ही काही परिस्थितीत काढू शकतात. पीएफचे पैसे काढण्याची प्रोसेस आता अजून सोपी झाली आहे.
EPF
EPF Saam Tv
Published On

पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पीएफ खात्यातून पैसे काढणे अधिक सोपे झाले आहे. आता तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज भासणार नाही. सरकारने ही प्रक्रिया अधिक सोपी केली आहे.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. जर तुमचे पीएफ खाते पॅन कार्ड आणि बँक डिटेल्स योग्यरित्या अपडेट असतील. ही सर्व माहिती ईपीएफओ रेकॉर्डमध्ये बरोबर जुळली तर काही मिनिटांत तुम्ही पीएफ खात्यातील पैसे ट्रान्सफर करु शकतात.

EPF
EPFO News: नोकरी करत असताना किती PF काढू शकता? जाणून घ्या नियम

EPFO ने २०१७ मध्ये कंपोजिट क्लेम फॉर्म (Composite Claim Form) सुरु केला होता. या फॉर्मच्या माध्यमातून तुम्ही लग्न, मेडिकल इमरजन्सी, मुलांचे शिक्षण आणि घर खरेदीसाठी पीएफमधून अॅडव्हान्स पैसे काढू शकत होता. हे पैसे काढण्यासाठी तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट किंवा दुसऱ्या कागदपत्रांची आवश्यकता होती. मात्र, आता तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही.

EPFO ने सांगितले की, सुरक्षेसाठी ओटीपी आणि फेस व्हेरिफिकेशन आता अनिवार्य केले आहे. जेणेकरुन कुठेही फसवणूक होणार नाही. आज ९० टक्के पेक्षा जास्त पीएफ दावे ऑनलाइन केले जात नाही. त्यापैकी अनेक दावे तीन दिवसांत सेटलमेंटद्वारे निकाली काढले जातात.

EPF
EPFO Latest Update : EPFO चा नवा नियम, आता घरे खरेदी करताना काढता येणार PF चे पैसे, प्रोसेस काय? जाणून घ्या

पीएफ काढण्याची सोपी पद्धत (PF Withdrawal Online Process)

ईपीएफओच्या वेबसाइट किंवा उमंग अॅपवर भेट द्या.

यानंतर UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

यानंतर आधार, पॅन कार्ड आणि बँक डिटेल्स अपडेट करा.

ऑनलाइन टॅबवर जा आणि क्लेम (फॉर्म-३१, १९, १०सी) वर क्लिक करा.

लग्न, आजारपण, घर खरेदी करणे कोणत्या कारणासाठी पीएफ काढायचा आहे त्याबाबत माहिती लिहा.

यानंतर ओटीपी आणि फेस व्हेरिफिकेशद्वारे फॉर्म सबमिट करा.

यानंतर तुमची सर्व माहिती बरोबर असेल तर फक्त ३ दिवसांत तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील. त्यामुळे ईपीएफओच्या वेबसाइटवर जा आणि तुमची माहिती अपडेट करा.

EPF
EPFO चा मोठा निर्णय; पीएफ खात्यात एकही पैसा नसला तरी EDLI मधून मिळतील ५०,०००रुपये
Q

पीएफ काय आहे?

A

पीएफ म्हणजे प्रोव्हिडंट फंड. पीएफमध्ये दर महिन्याला पैसे जमा केले जातात. पीएफ ही एक गुंतवणूक आहे.

Q

पीएफमधील पैसे कोणत्या कारणासाठी काढतात?

A

पीएफमधील पैसे तुम्ही काही कारणासाठी काढू शकतात. मेडिकल इमरजन्सी, घर खरेदी करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे काढू शकतात.

Q

पीएफचे पैसे कसे काढायचे?

A

पीएफचे पैसे काढण्यासाठी तुम्हाला तुम्हाला ऑनलाइन वेबसाइटवर जावे लागेल. EPFOच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही पैसे काढण्यासाठी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com