EPFO New Rule Saam tv
बिझनेस

EPFO Rules: नोकरी गेली तरी PF वर व्याज मिळते? वाचा नियम काय सांगतो

PF Interest Withdrawal Rules By EPFO: ईपीएफओ कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते असते. पीएफ खात्यावर दरवर्षी व्याजदर जमा केले जाते. दरम्यान, नोकरी बदलल्यावर ईपीएफओ खात्यावर असेच व्याजदर मिळते का जाणून घ्या.

Siddhi Hande

ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या कामाची बातमी

नोकरी बदलल्यावर पीएफ खात्यावर व्याज मिळते का?

वाचा ईपीएफओचे नियम काय सांगतात

प्रायव्हेट क्षेत्रात काम कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट हे असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पगारातील काही रक्कम जमा केली जाते. पीएफ खात्यातील पैसे ही एक गुंतवणूक असते. दरम्यान, सेवानिवृत्तीनंतर पीएफ खात्यातील रक्कम दिला जाते. चांगलाच फंड जमा होतो. सरकार पीएफ खात्यावर व्याज देते. दर वर्षी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर व्याजदर जमा केले जाते.

पीएफचे पैसे ईपीएफओद्वारे जमा केले जातात. दरम्यान, जर तुम्ही मध्येच नोकरी सोडली तर पीएफ खात्याचं काय होणार, त्यातील जमा रक्कम तुम्हाला मिळणार की नाही, याचसोबत जमा रक्कमेवरील व्याजदर तसेच सुरु राहणार की काय होणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेला असतो.

जर तुमची नोकरी गेली तरीही तुमच्या खात्यात व्याजदर जमा होणार आहे परंतु त्यासाठी काही अटी आहे. ईपीएफओच्या नियमाबाबत माहिती जाणून घ्या.

५५ व्या वर्षी सेवानिवृत्ती झाल्यावर नियम

जर कर्मचारी ५५ व्या वर्षी रिटायर्ड झाला तर पीएफमध्ये त्यानंतर पैसे जमा होत नाही. जर खात्यातील पैसे काढले नाही तर त्यातील ट्रान्झॅक्शन बंद होते परंतु खातं तसंच राहते. तुम्ही वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत व्याज मिळवू शकतात. तुम्हाला ५८ वर्षापर्यंत व्याज मिळत राहिल. जे लोक नोकरी बदलतात किंवा लवकर सेवानिवृत्ती घेतात त्यांच्यासाठी हा नियम आहे.

५५ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यावर व्याजदराचे नियम थोडे वेगळे आहेत. ईपीएफओ खात्यात ३ वर्षांपर्यंत व्याजदर दिले जाते. यानंतर जर कोणतेही ट्रान्झॅक्शन झाले नाही तर खाते निष्क्रिय मानले जाते. यानंतर व्याज मिळणे बंद होते. त्यामुळे तुम्ही वयाच्या ५८ वर्षानंतर खात्यातून पैसे काढू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT