EPFO  Google
बिझनेस

EPFO Rules: EPFO चा नवीन नियम! आता हे कर्मचारी आधार कार्डशिवाय करु शकणार PF क्लेम; कसं? जाणून घ्या प्रोसेस

EPFO New Rules: पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओच्या नियमांमध्ये बदल झाला आहे. आता काही सदस्य आधार कार्डशिवावाय पीएफ क्लेम करु शकणार आहेत.

Siddhi Hande

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंट हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीशी जोडले गेलेले असते. नुकतेच ईपीएफओने काही नियम जाहीर केले आहे. यामध्ये काही कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN)आधारशी लिंक करण्यात सूट देण्यात आली आहे.

ईपीएफओच्या या निर्णयामुळे ज्या कर्मचाऱ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना पीएफसाठी क्लेम करणे सोपे होणार आहे. (EPFO Rule)

कोणाला मिळणार सूट?

आंतरराष्ट्रीय कर्मचारी- ज्या कर्मचाऱ्यांनी भारतात काम केले आहे त्यानंतर परत परदेशात गेले आहेत आणि आधार कार्ड घेऊ शकले नाही त्या लोकांना यूएएन आणि आधार लिंक करण्याची गरज नाही.

इतर देशांची नागरिकत्व प्राप्त भारतीय- जे भारतीय लोक परदेशात जाऊन काम करतात. त्यांनी परदेशातील देशांचे नागरिकत्व मिळवलेल्या लोकांनाही यातून सूट मिळणार आहे.

नेपाळ आणि भूटानचे नागरिक असलेल्या कर्मचाऱ्यांनाही आधार आणि यूएएन नंबर लिंक करणे अनिवार्य नाही.

EPF & MP अधिनियमअंतर्गत येणारे असे कर्मचारी जे भारताबाहेर राहतात त्या कर्मचाऱ्यांना यातून सूट मिळणार आहे. (EPFO Rule News)

क्लेम कसं करावं?

EPFO ने कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कागदपत्रांच्या आधारे पीएफ क्लेम करु शकतात. तुम्ही कोणत्या कागदपत्रांच्या आधारे पीएफ क्लेम करु शकतात ते जाणून घ्या.

तुम्ही पासपोर्ट, नागरिकत्वाचा दाखला आणि आयडी प्रुफद्वारे पीएम क्लेम करु शकतात. पॅन, बँक खाते आणि इतर कागदपत्रांच्या आधारे वेरिफिकेशन करु शकतात. तुम्ही जर ५ लाखांपेक्षा अधिक रुपयांसाठी क्लेम करत असाल तर नियोक्ताचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

EPFO चे नियम

अधिकारी सर्वप्रथम तुमच्या सर्व अर्जांची आणि कागदपत्रांची छाननी करतील. त्यांनी OIC च्या माध्यमातून ई ऑफिस फाइलकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर UAN नंबर द्यावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: दिवाळीत दिसा सुंदर! या 3 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नॅचरल ग्लो

Dhanteras Puja: धनत्रयोदशीची पूजा कशी करायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि साहित्य

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Bigg Boss 19: 'तू खूप निर्लज आणि इरिटेटिंग...'; शेहबाजवर संतापला सलमान खान, पाहा VIDEO

ठाकरे बंधूंचं 'अब ती बार ७५ पार', ठाणे महापालिकेसाठी रणशिंग फुंकले, बड्या खासदाराने दिले संकेत

SCROLL FOR NEXT