EPFO News Saam Tv
बिझनेस

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

EPFO Balance Check: ईपीएफओ खात्यात दर महिन्याला पैसे जमा केले जातात. ईपीएफओ खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही घरबसल्या मिळवू शकतात.

Siddhi Hande

ईपीएफओ खातेधारकांच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला एक ठरावीक रक्कम जमा केली जाते. पीएफ अकाउंटमध्ये काही रक्कम कर्मचारी आणि काही रक्कम नियोक्त्यांकडून जमा केली जाते. ईपीएफओ खातेधारकांना जास्तीत जास्त व्याजदर मिळते. यामध्ये पैसे जमा करणे ही एक गुंतवणूकच असते. दरम्यान, तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत की नाही हे घरबसल्या चेक करु शकतात.

तुम्ही वेबसाइटवरुन, मिस्ड कॉल देऊन किंवा एसएमएसद्वारे पीएफ अकाउंटमधील पैसे चेक करु शकतात.

पोर्टलवरुन करु शकतात पीएफमधील पैसे (How To Check PF Balance)

तुम्ही EPFO पोर्टलवरुन पीएफ बॅलेंसची माहिती मिळवू शकतात.

यासाठी EPFO पोर्टलवर जा.

यानंतर Our Services सेक्शनवर जा. यानंतर For Employees वर क्लिक करा.

यानंतर पासबुक या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर यूएएन नंबर आणि पासवर्ड टाका.

मिस्ड कॉल द्या अन् पीएफमधीन बॅलेंस चेक करा

तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या.

यानंतर तुम्हाला तुमच्या फोन नंबरवर पीएफ खात्यातील बॅलेंसची माहिती मिळणार आहे.

SMS द्वारे चेक करा.

तुम्हाला जो नंबर पीएफ खात्याशी लिंक आहे. त्यावरुन 7738299899 नंबरवर मेसेज करायचा आहे.

त्यावर तुम्हाला EPFOHO UAN ENG असा मेसेज करायचा आहे.

ENG चा अर्थ इंग्रजी असा होतो. तुम्हाला जर मराठी भाषेत हवं असेल तर शेवटी MAR असं लिहायचं आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या भाषेत माहिती मिळणार आहे.

उमंग अॅपवरुन करता येणार बॅलेंस चेक

तुम्हाला सर्वात आधी उमंग अॅपवर जायचे आहे.

यानंतर ईपीएफओ ऑप्शन निवडा.

यानंतर Employee Centric Services वर क्लिक करा.

त्यानंतर यूएएन नंबर टाकून ओटीपी टाका.

यानंतर तुम्हाला पीएफबाबत सर्व माहिती मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऊसदर आंदोलनाचा ट्रक चालकांना मोठा फटका, २० रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

Ramayana Movie Review : रामाची मर्यादा, रावणाचा अहंकार अन् सीतेची शक्ती; रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला?

PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

Silent Health Warning: सकाळी उठताच थकवा आणि पोट फुगल्यासारखे वाटतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार

SCROLL FOR NEXT