PF Interest Rate: PF खात्यात किती व्याजदर मिळते? तुमच्या पगारावर किती पैसे मिळतात? वाचा कॅल्क्युलेशन

PF Interest Rate: पीएफ खात्यात दर महिन्याला पगारातील ठरावीक रक्कम जमा केली जाते. पीएफ खात्यातील रक्कमेवर तुम्हाला व्याजदर मिळते.
PF Interest Rate
PF Interest RateSaam Tv
Published On

पीएफ अकाउंटमध्ये कर्मचारी दर महिन्याला पगारातील ठरावीक रक्कम जमा केली जाते. या रक्कमेवर तुम्हाला व्याज दिले जाते. पीएफ अकाउंटमध्ये गुंतवणूक ही फायद्याची असते. या योजनेत तुम्हाला इतर योजनांपेक्षा जास्त व्याजदर मिळते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात फायदाच होतो.

PF Interest Rate
कॅन्सल चेक अन् व्हेरिफिकेशनची झंझट संपली; आता PF साठी ऑनलाइन क्लेम करणे होणार आणखी सोपं; EPFOची मोठी घोषणा

ईपीएफ खात्यातील रक्कमेवर सध्या ८.२५ टक्के व्याजदर मिळते. हे व्याजदर सर्वाधिक आहे. बँकेच्या एफडीपेक्षा हे व्याजदर जास्त आहे. त्यामुळे पीएफ खात्यातील पैसे न काढण्याचा सल्ला दिला जातो. पीएफ खात्यातील हे व्याजदर ईपीएफ खात्यात जमा केले जाते.

पीएफ खात्यावर किती व्याज मिळणार? (PF Interest Rate)

ईपीएफ स्कीम १९५२ च्या कलम ६० अंतर्गत प्रत्येक महिन्याला किवा वर्षाच्या शेवटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याज जमा केले जाते.

जर तुमच्या पीएफ खात्यात ५ लाख रुपये आहे. तुमची बेसिक सॅलरी ६०,००० रुपये आहे. या पगाराचे १२ टक्के म्हणजेच ७२०० रुपये तुमच्या पीएफ खात्यात जमा केले जातात. नियोक्तादेखील ७२०० रुपये जमा करतात. परंतु नियोक्त्याच्या रक्कमेतील ८.६७ टक्के रक्कम पेन्शन योजनेत जमा केली जाते. ही रक्कम १२५० रुपये असते.

PF Interest Rate
EPFO News: या कारणांसाठी PF चे पैसे काढता येणार; अटी काय? अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

वर्षभरात तुमच्याकडून ८६४०० रुपये जमा केले जातात. नियोक्त्याकडूनदेखील तेवढीच रक्कम जमा केली जाते. त्यातील ७१४०० रुपये पेन्शन योजनेत जाते. यावर तुम्हाला ८.२५ टक्के व्याजदर लागू करता येते.

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या वर्षी हे व्याज दिले जाते. परंतु हे व्याज तुमच्या खात्यात काही दिवसांनी जमा होते. हे पैसे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये क्रेडिट होतात. तुम्ही ईपीएफ पोर्टल, उमंग अॅप किंवा एसएमएसद्वारे तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले हे चेक करु शकतात.

PF Interest Rate
Provident Fund: PF अकाऊंटमध्ये किती पैसे जमा झाले? UNA नंबरशिवाय चेक करा बॅलन्स, फॉलो करा सोप्या टिप्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com