EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO Pension Hike: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ₹३००० होणार

EPFO Pension Hike Update: ईपीएफओ लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे. आता ईपीएफओ पेन्शनधारकांची किमान पेन्शन ३००० रुपये करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे.

Siddhi Hande

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

किमान पेन्शन ३००० रुपये होणार

पेन्शनधारकांना होणार फायदा

ईपीएफओ कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच खुशखबर मिळू शकते. आता किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते. किमान पेन्शन तीन पटीने वाढू शकतात. सध्या हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच मोठा निर्णय होऊ शकतो.

ईपीएफओचे निर्णय घेणारी संस्था सीबीटीचे सदस्य एसपी तिवारी यांनी याबाबत माहिती दिली आहे. सेवानिवृत्तीनंतर ईपीएओ कडून मिळणारी किमान पेन्शन १ हजारांवरुन ३ हजार रुपये करण्याच्या तयारीत आहे.

सीबीटीच्या तीन बैठकांमध्ये या प्रस्तावावर सहमती देण्यात आली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनाही सहमती दर्शवली आहे. ईपीएफओ आपल्या स्वतः च्या व्याजातून आणि इतर संसाधनांमधून देशातील ४० लाख निवृत्तीवेतनधारकांना ३००० रुपयांचे मासिक पेन्शन देण्यास सक्षम आहे. दरम्यान, किमान पेन्शन ७५०० करण्याची मागणी केली जात होती. परंतु ही मागणी करणे सध्या अशक्य आहे.

ईपीएफओ ३.० वर अपडेट (EPFO 3.0 Update)

सीबीटी बोर्डाचे सदस्य आणि टीयूसीसी फेडरेशनचे सरचिटणीस एस.पी तिवारी यांनी ईपीएफओ कार्यालयाला भेट दिली होती. त्यांनी सांगितले की, यूपीआयद्वारे पीएफ थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रोसेस जवळपास पूर्ण झाली आहे. सर्व सदस्यांना जुलैपासून पीएफ बँक खात्यातून काढता येणार आहे. सदस्य पीएफ ठेवींपैकी फक्त ५० टक्के रक्कमच काढू शकतात.

ईपीएफओ ३.० पोर्टल १ जूनपासून सुरु होण्याची शक्यता आहे. याद्वारे तुम्ही एटीएम आणि यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढू शकतात. यामुळे कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT