PM Shram Yogi Mandhan Yojana: कर्मचाऱ्यांना दर महिन्याला मिळतात ३००० रुपये; जाणून घ्या केंद्र सरकारच्या योजनेबद्दल

PM Shram Yogi Mandhan Yojana Benefits All you need to know: केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन मिळते.
PM Shram Yogi Mandhan Yojana
PM Shram Yogi Mandhan YojanaGoogle
Published On

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी पैसे जमा करतो. वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. यासाठी संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी पीएफ किंवा पेन्शन योजना सुरु आहे. या योजनेत सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पैसे मिळतात. परंतु असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय? त्यांच्यासाठीही सरकारने योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत या कर्मचाऱ्यांना पेन्श मिळते.

PM Shram Yogi Mandhan Yojana
Government Scheme: व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय सरकार देतंय ३ लाखांचं कर्ज; काय आहे योजना?

पीएम श्रम योगी मानधन योजना

पीएम श्रम योगी मानधन योजना २०१९ मध्ये सुरु करण्यात आली होती. ही योजना असंघठित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आहे. स्ट्रीट वेंडर,ड्रायव्हर, रिक्षा चालक, कृषि श्रमिक या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सुरु केली आहे.

पेन्शन

असंघठिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना या योजनेअंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर ३००० रुपये मासिक पेन्शन मिळते.ही योजने त्या नागरिकांसाठी आहे ज्यांचे मासिक उत्पन्न १५००० किंवा त्यापेक्षा कमी आहे. १८ ते ४० वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो.

किती पैसे गुंतवायचे?

या योजनेत कर्मचाऱ्यांनी अकाउंटमध्ये ठरावीक रक्कम जमा करायची आहे. जेवढे पैसे तुम्ही जमा करणार तेवढेच पैसे सरकरादेखील जमा करतात. या योजनेत तुम्ही वयानुसार पैसे जमा करु शकतात. १८ व्या वर्षापासून दर महिन्याला ५५ रुपये जमा केले तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर ३००० रुपये मिळतात.

PM Shram Yogi Mandhan Yojana
Birth Rate Scheme: तिसऱ्या बाळाला जन्म, 50 हजार मिळणार? जन्मदर वाढीचं नवं मॉडेल

जर तुम्ही २९ व्या वर्षी पैसे गुंतवायला सुरुवात केली तर महिन्याला १०० रुपये भरावे लागतील.४० व्या वर्षी २०० रुपये प्रत्येक महिन्याला भरावे लागणार आहे. वयाच्या ६० वर्षांपर्यंत तुम्हाला हे पैसे भरायचे आहेत.

PM Shram Yogi Mandhan Yojana
LIC Scheme: दररोज १५० रुपये भरा अन् १९ लाख मिळवा; LIC ची भन्नाट योजना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com