Narendra Modi News
Narendra Modi NewsSaamTv

Yojana: दरमहा ३००० रुपये देणारी योजना कोणती? पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेसाठी नेमके कोण पात्र?

Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana: भारत सरकार आर्थिकदृष्ट्या बळकट नसणाऱ्या नागरिकांसाठी एक योजना राबवत आहेत. या योजनेंतर्गत आपल्याला दरमहा ३००० रुपये पेन्शनच्या स्वरूपात मिळेल.
Published on

भारत सरकार आर्थिकदृष्ट्या बळकट नसणाऱ्या नागरिकांसाठी एक योजना राबवत आहेत. या योजनेंतर्गत आपल्याला दरमहा ३००० रुपये पेन्शनच्या स्वरूपात मिळेल. या योजनेचं नाव आहे, पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना. या योजनेचे अनेक फायदे आहेत. या योजनेसाठी कोण पात्र? या योजनेचा फायदा नक्की कुणाला कसा होईल? पाहा.

पीएम-एसवायएम योजना म्हणजे काय?

या योजनेत १८ ते ४० वयोगटातील लोक अर्ज करू शकतात. जर एखादा कामगार या योजनेचा सदस्य बनला आणि वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत पैसे जमा करत राहिला तर त्याला ३००० रुपयांपर्यंत मासिक पेन्शनचा लाभ मिळेल. तसेच त्याच्या/तिच्या मृत्यूनंतर, जोडीदाराला पेन्शनचे ५० टक्के रक्कम मिळेल. याशिवाय, या योजनेत नामांकनाची सुविधा देखील उपलब्ध असेल. लाभार्थी या योजनेअंतर्गत कोणाचेही नाव जोडू शकतो.

Narendra Modi News
Crime News: शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षांची गुंडगिरी, पोलीस पाटलांवर लोखंडी रॉडनं प्राणघातक हल्ला

लाभ कोणाला मिळेल?

या योजनेत रस्त्यावरील विक्रेते, हमाल, मोची, कचरा वेचणारे, घरकामगार, धोबी, रिक्षाचालक, कामगार, शेती कामगार, बांधकाम कामगार, बीडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार यांचा समावेश असेल.

या लोकांचे मासिक उत्पन्न १५,००० रुपये असावे. याशिवाय, जे कर्मचारी NPS, ESIP आणि EPFO अंतर्गत येत नाहीत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेसाठी वयाच्या १८ व्या वर्षापासून ५५ रुपये जमा करून आपण सुरुवात करू शकता.

Narendra Modi News
Pune News: अंगावर आधी पेट्रोल ओतलं अन् ...पोलीस ठाण्यातच तरूणानं असं का केलं?

कोणती कागदपत्रे आवश्यक?

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीला आधार कार्ड, बँक पासबुक आणि स्व-प्रमाणित फॉर्म सादर करावा लागेल. पैसे जमा करण्यासाठी, दरमहा ऑटो-डेबिटद्वारे हप्ता कापला जाईल. पहिला हप्ता कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये रोख स्वरूपात जमा करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com