EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO Pension Hike: EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ९००० होणार? वाचा सविस्तर

EPFO Pension Hike Update: ईपीएफओ पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्मचाऱ्यांची पेन्शन १००० रुपयांवरुन ९००० रुपये करण्याची मागणी सध्या केली जात आहे. आता ही मागणी पूर्ण होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Siddhi Hande

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओअंतर्गत खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कामगार संघटनांनी ईपीएस ९५ अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची मागणी केली आहे. पेन्शन १००० रुपयांवरुन ९००० रुपये करण्याची मागणी पुन्हा केली आहे. हा मुद्दा संसेदत आणि सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. यामुळे पेन्शनवाढीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

EPS 95 म्हणजे काय?

EPS 95 म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना १९९५. ही सरकारी पेन्शन योजना आहे. ही योजना खासगी क्षेत्रातकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी डिझाइन केलेली आहे. ही ईपीएफओद्वारे चालवली जाते.

जेव्हा कर्मचारी पीएफमध्ये पैसे जमा करते तेव्हा नियोक्त्याच्या योगदानातील ८.३ टक्के रक्कम पेन्शन फंडात जमा केली जाते. सरकार यावर १५ हजार रुपयांपर्यंतच्या पगारावर १.१६ टक्के परतावादेखील देतात. यामध्ये कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळते.

सध्या ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शनची रक्कम पगारावर आणि सेवेच्या वर्षांवर निश्चित केली जाते. किमान पेन्शन ही १००० रुपये आहे. आता ही पेन्शन वाढवण्याची मागणी केली जात आहे. ७,५०० रुपयांची पेन्शन फक्त १५,००० रुपये पगार मर्यादा आणि ३५ वर्षे सर्व्हिस केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होते. दरम्यान, काही पेन्शनधारकांना त्यांच्या कामाच्या वर्षानुसार जास्त पेन्शन मिळते. त्यांना ९००० रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते.

पेन्शन ९००० रुपयांपर्यंत वाढवणार का? (EPFO Pension Hike)

किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ९००० करण्याची मागणी केली जात आहे. म्हणजेच पेन्शन ९ पट वाढवण्याची मागणी आहे. ईपीएस सध्या निश्चित टक्केवारीनुसार चालते. यासाठी सरकारी दरवर्षी एक्कयुअरीयल मूल्यांकन करते. मात्र, मोठ्या वाढीमुळे पेन्शन फंडावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी याबाबत कोणताही निर्णय होण्याची शक्यता कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT