EPFO  Saam Tv
बिझनेस

PF Claim: PF चे पैसे ई-वॉलेटद्वारे वापरता येणार? EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

PF Claim News: पीएफचे पैसे एटीएमद्वारे काढता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता तुम्ही ई- वॉलेटद्वारेदेखील पीएफचे पैसे वापरु शकणार आहात.

Siddhi Hande

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातील १२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. यातील काही रक्कम कर्मचारी तर काही रक्कम कंपनीद्वारे जमा केली जाते. पीएफ खात्यातील पैसे ही एक गुंतवणूक असते. या पीएफ खात्यावर तुम्हाला खूप जास्त व्याजदर मिळते. (PF News)

पीएफ खात्यातील रक्कम तुम्ही आप्तकालीन परिस्थितीत काढू शकतात.तुम्ही लग्न, मेडिकल इमरजन्सी किंवा घर बांधण्यासाठी पीएफ खात्यातील रक्कम काढू शकतात.आता लवकरच पीएफ एटीएम कार्डद्वारे काढण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यानंतर आता तुम्ही पीएफ खात्यातील रक्कम ई-वॉलेटद्वारेदेखील वापरु शकतात.

ई वॉलेटद्वारे पैसे वापरु शकणार

सध्या पीएफ खातेधारकाला जर पैसे काढायचे असतील तर ऑनलाइन क्लेम करावा लागतो. त्यानंतर ७-१० दिवसांत दावा निकाली काढला जातो. त्यानंतर तुम्हाला लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे दिले जातात. परंतु आता ही प्रक्रिया बदलली जाऊ शकते.

कर्मचाऱ्या भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्या आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच आता दाव्याची रक्कम वापरण्यासाठी ई-वॉलेट सक्षम असेल. श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव सुमिता डावरा यांनी १८ डिसेंबर रोजी ही माहिती दिली आहे.

एटीएममधून पैसे काढता येतील (PF Can Withdraw Through ATM)

याबाबत सुमिता डावरा यांनी सांगितले की, सध्या पीएफ क्लेम केल्यानंतर रक्कम तुम्हाला पीएफ किंवा लिंक असलेल्या बँक खात्यातून काढावी लागते. परंतु आता पुढील वर्षापासून तुम्ही पीएफ क्लेमची रक्कम एटीएममधून काढू शकतात. याचसोबत आता तुम्हाला पीएफ क्लेमची रक्कम ई- वॉलेटवरही काढता येणार आहे. यासंबंधित बँकेशी बोलणी सुरु झाली आहे. ही योजना लवकरच सुरु करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT