Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीनंतरचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले होते.
ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्याचे पैसे आले होते.
मात्र आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार आहे.
डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा मकरसंक्रांतपूर्वी महिलांच्या खात्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.