EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Siddhi Hande

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. प्रत्येक कर्मचाऱ्याचे दर महिन्याला पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा केले जातात.हे पैसे तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन स्वरुपात मिळतात. यामुळेच कर्मचारी भविष्य निधी योजनेचे सर्व कर्मचारी सदस्य असतात.

कर्मचारी भविष्य निधी योजनेसाठी कर्मचाऱ्याला यूएएन नंबर खूप महत्त्वाचा असतो. युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा प्रत्येक कर्मचाऱ्याला दिलेला असतो. हा १२ अंकी नंबर ईपीएफओद्वारे जारी केलेला असतो. तुम्ही कितीही नोकऱ्या बदलल्या तरीही यूएएन नंबर हा तोच असतो.

जे सदस्य EPFO चा भाग आहेत त्यांना UAN नंबर दिला जातो. तुमचा UAN नंबर काय आहे हे जाणून घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • त्यानंतर Our Services वर क्लिक करा.

  • यानंतर For Employees या सेक्शन मध्ये जाऊन Member UAN/Online Services वर क्लिक करा.

  • यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पीएफ आयडी टाका.

  • यानंतर Get Authorization PIN वर क्लिक करा. यानंतर तुमच्या फोनवर पिन नंबर पाठवला जाईल. यानंतर ओटीपी टाका.

  • यानंतर तुम्हाला तुमचा UAN नंबर दिसेल.

UAN मधून तुम्ही कोणत्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात?

पीएफ ट्रान्सफर

जर तुम्ही नोकरी बदलत असाल तर UAN नंबरच्या माध्यमातून जुने पीएफ खाते नवीन पीएफ खात्यात ट्रान्सफर करु शकतात.

बॅलेंस चेक

तुम्ही UAN नंबरच्या माध्यमातून पीएफ खात्यातील बॅलेंस ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phullwanti: प्राजक्ता माळीच्या चित्रपटात दिसणार 'हे' कलाकार

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

SCROLL FOR NEXT