ईपीएफओ (EPFO) खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांना मोठी दिलासा दिला आहे. आता कर्मचारी आजारपणासाठी पीएफ खात्यातून १ लाखांपर्यंतची रक्कम काढू शकतात. यापूर्वी कर्मचारी फक्त ५०,००० रुपये काढू शकत होते. त्यानंतर आता या नियमांमध्ये बदल झाले आहेत.
कर्मचारी भविष्य निर्वाहन निधी संघटनेच्या या नवीन नियमांमुळे पीएफ खातेधारकांना फायदा होणार आहे. ही सुविधा ईपीएफ फॉर्म ३१ अंतर्गत देण्यात आली आहे. १६ एप्रिल २०२४ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. (EPFO New Rule)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत पॅरा 68J अंतर्गत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चासाठी पैसे काढले जाऊ शकतात. कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती १ महिन्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात असेल किंवा मोठे ऑपरेशन, टीबी, कर्करोज यांसारख्या गंभीर परिस्थितीत तुम्ही पैसे काढू शकतात. जर तुमच्या पीएफ खात्यात एवढी रक्कम असेल तर तुम्ही १ लाखांपर्यंत पैसे काढू शकतात.जर १ लाखांपेक्षा कमी रक्कम असेल तर त्याआधारे तुम्ही पैसे काढू शकतात.
ईपीएफओमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला EPFO फॉर्म 31 भरावा लागतो. याअंतर्गत तुम्ही लग्न, घर बांधकाम, घर खरेदी किंवा वैद्यकीय खर्चांसाठी पैसे काढू शकतात. पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्याला कंपनीकडे वैद्यकीय कागदपत्रे सादर करावी लागतील.
ईपीएफओअंतर्गत तुम्ही वैद्यकीय खर्चाशिवाय इतर अनेक कारणांसाठी पैसे काढू शकतात. तुम्ही घर खरेदी करण्यासाठी, गृहकर्ज फेडण्यासाठी किंवा मुलांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठीही पैसे काढू सखतात. तसेच अपंग लोकांसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी तुम्ही पैसे काढू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.