PF अकाउंटमध्ये दर महिन्याला फक्त एवढे पैसे करा जमा... निवृत्तीनंतर मिळतील ३ ते ५ कोटी रुपये

PF Calcutaion For 3 to 5 Crore Investment: पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा करणे ही एक गुंतवणूक असते. पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा करुन तुम्ही सेवानिवृत्तीनंतर ३ ते ५ कोटी रुपये जमा करु शकतात.
PF Calcutaion
PF CalcutaionSaam Tv
Published On

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत, कर्मचारी आणि नियोक्ता म्हणजे कर्मचारी काही रक्कम जमा करतात. जर तुम्हाला ईपीएफओमध्ये कोट्यवधी रुपये जमा करायचे असतील तर किती योगदान द्यावे लागेल याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

ईपीएफओमध्ये पैसे जमा करणे ही एक गुंतवणूक असते. या गुंतवणूकीवर तुम्हाला परतावा मिळतो. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

PF Calcutaion
Lakhpati Didi Scheme: महिलांसाठी खुशखबर! व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय ५ लाखांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे लखपती दीदी योजना?

व्याज

केंद्र सरकारच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यावरील व्याजदर हे वार्षिक आधारावर ठरवले जाते. सध्या पीएफ खात्यावर सरकार ८.२५ टक्के व्याजदर देते. हे व्याज दरवर्षी जमा केले जाते. पीएफमध्ये ठेवी व्याजावर कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही.

आप्तकालीन स्थितीत पैसे काढता येईल

EPFO कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढण्याची सुविधा देते. शिक्षण, लग्न,घर बांधण्यासाठी किंवा आजारपणासाठी तुम्ही पीएफ अकाउंटमधून पैसे काढू शकतात.

PF Calcutaion
Post Office Scheme: फायदाच फायदा, पोस्ट ऑफिसच्या १० जबरदस्त योजना! तुम्ही कुठे गुंतवणूक केली?

३ ते ५ कोटी रुपये जमा करण्यासाठी किती योगदान द्यावे लागेल?

  1. निवृत्तीनंतर तुम्हाला ३ कोटी रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला सलग ४० वर्षे दर महिन्याला ८,४०० रुपये योगदान द्यावे लागेल. यावर तुम्हाला ८.२५ टक्के व्याज मिळेल.

  2. जर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर ४ कोटी रुपये मिळवायचे असेल तर दर महिन्याला ११,२०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.यावर तुम्हाला ८.२५ टक्के व्याज मिळेल. त्यामुळे ४,०२,५९,७३८ रुपये मिळतील.

  3. जर तुम्हाला ५ कोटी रुपये मिळवायचे असतील तर दर महिन्याला १२,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.तेव्हा तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर ५ कोटी रुपये मिळतील.

पीएफ अकाउंटमधील बॅलेंस कसं चेक करावं?

तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन ९९६६०४४४२५ या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर मेसेज पाठवला जाईल. या मेसेजमध्ये तुम्हाला खात्यात किती रक्कम आहे याची माहिती मिळेल. तसेच तुम्ही उमंग अॅपवरुनदेखील तुमचा बॅलेंस चेक करु शकतात.

PF Calcutaion
Modi Government Schemes: हक्काचे घर ते अपघात विमा; मोदी सरकारच्या या ६ योजना माहित आहेत का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com