EPFO UAN Face Authentication saam Tv
बिझनेस

No पेपर वर्क! फक्त चेहरा दाखवला तरी बनेल तुमचं UAN; EPFOची नवी सुविधा

EPFO UAN Face Authentication: कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी ईपीएफओने एक नवीन सुविधा सुरू केलीय. याअंतर्गत सदस्य आता फेस ऑथेंटिकेशनद्वारे UAN मिळवू शकतील.

Bharat Jadhav

कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी ईपीएफओने एक नवीन सुविधा सुरू केलीय. या सुविधेच्या मदतीने सदस्य आता फेस ऑथेंटिकेशनद्वारे UAN मिळवू शकतील. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असेल, त्यामुळे त्यांना कुठेही जाण्याची गरज भासणार नाहीये. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाली असल्याने फक्त चेहरा दाखवून कर्मचारी आपला UAN बनवू शकतील.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने एक नवीन सुविधा सुरू केलीय. या नव्या सुविधेची माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी मंगळवारी दिली. आता तुमचा चेहराच तुमची ओळख असणार आहे. याच्या मदतीने तुम्ही क्षणार्धात UAN जनरेट करू शकाल. यासाठी कागदाची आवश्यकता नसणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला लांब रांगेतही उभे राहण्याची गरज राहणार नाहीये.

फक्त उमंग अॅप उघडा, तुमचा चेहरा दाखवा आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे UAN मिळेल. हे तंत्रज्ञान पूर्णपणे संपर्करहित आणि डिजिटल असणार आहे. हे तंत्रज्ञान कर्मचारी स्वतः तयार करू शकतात किंवा मालक त्यांच्या नवीन कर्मचाऱ्यांसाठी ते तयार करू शकतात. यामुळे युएएन बनवण्याची प्रक्रिया काही मिनिटांत होईल.

आधार कार्ड येईल कामात

फेस ऑथेंटिकेशनद्वारे UAN तयार करण्यासाठी, ग्राहकाला त्याच्या आधारद्वारे पडताळणी करावी लागेल. तुम्ही ही प्रक्रिया उमंग अॅप किंवा पोर्टलवर पूर्ण करू शकतील. एकदा पडताळणी झाली की, तुमचा UAN तुमच्या फोनवर मेसेज म्हणून पाठवला जाईल. तांत्रिक पद्धतीने चेहरा पाहिला जात असल्याने १००% अचूकतेने व्यक्तीची ओळख पटवली जाते. त्यामुळे फसवणुकीला वाव राहत नाही. ज्यांच्याकडे UAN आहे पण त्यांनी ते सक्रिय केलेले नाही त्यांच्यासाठी मार्ग सोपा झालाय.

उमंग अॅपने ऑथेंटिकेशन करून युएएन मिळवलं जाणार आहे, त्यामुळे आधीसारखं ओटीपी किंवा कागदांची गरज राहणार नाही. पुढील काही दिवसांमध्ये अजून चांगल्या आणि सोप्या सुविधा लागू केल्या जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT