EPFO  Saam tv
बिझनेस

नोकरदारांसाठी मोठी अपडेट! EPFO मध्ये अतिरिक्त रक्कम भरण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या काय होऊ शकतो बदल

EPFO New Update: UAN क्रमांकाच्या माध्यमातून कर्मचारी स्वतःच्या पीएफ खात्यात अतिरिक्त रक्कम जमा करू शकतील, असा प्रस्ताव आहे. मात्र, या सुविधेला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही.

Namdeo Kumbhar

EPFO New Update : आता प्रत्येक नोकरदाराला निवृत्तीनंतरची रक्कम वाढवण्याचा नवा मार्ग खुला होऊ शकतो. कर्मचाऱ्यांना आपल्या इच्छेनुसार थेट पीएफ खात्यात जास्तीचे पैसे भरता यावेत, असा प्रस्ताव ईपीएफओने (EPFO) मांडला आहे. त्यासाठी यापुढे कंपनी किंवा मालकाची मदत किंवा परवानगी घेण्याची गरज पडणार नाही. असे भरलेले पैसे पीएफ खात्यात जमा होऊन त्यावर नियमांनुसार व्याजही मिळेल.

केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) २४० व्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला. या योजनेनुसार, यूएएन (UAN) क्रमांकाशी जोडलेल्या प्रणालीद्वारे कर्मचारी स्वतःचे पैसे तसेच इतर कोणाकडून मिळणारी रक्कम (थर्ड पार्टी) अशा छोट्या रकमा थेट पीएफ खात्यात टाकू शकतील. पण हा नियम अद्याप लागू झालेला नाही, यावर पुढील मंजुरी आणि कर नियमांशी संबंधित प्रक्रिया बाकी आहे.

ईपीएफओचा नवीन प्रस्ताव काय आहे?

या प्रस्तावानुसार, ज्यांच्याकडे UAN नंबर आहे असे कर्मचारी कंपनीच्या पगाराच्या प्रणालीवर अवलंबून न राहता थेट आपल्या पीएफ खात्यात जास्तीचे पैसे भरू शकतील. तसेच ग्राहकांकडून मिळणारी टीप यांसारखी लहान रक्कमही खात्यात टाकण्याचा पर्याय मिळेल. कर्मचारी आपली थोडी बचत किंवा इतर कमाई पीएफ खात्यात जमा करून त्यावर व्याज मिळवू शकतील.

गिग कामगारांनाही होऊ शकतो फायदा

या प्रस्तावात दुसऱ्याकडून मिळणाऱ्या छोट्या रकमेचा (थर्ड-पार्टी मायक्रो-कंट्रिब्युशन) उल्लेख आहे. डिलिव्हरी पार्टनर, गिग वर्कर आणि फ्रीलान्सर यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. ते आपल्या टिप्स किंवा जास्तीच्या कमाईतील काही रक्कम थेट पीएफ खात्यात साठवून त्यावर व्याज कमावू शकतील.

आधी काय नियम होता?

सध्या कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यात निर्धारित पगार मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा करण्याचा पर्याय निवडू शकतात. पण ही अतिरिक्त रक्कम त्यांच्या नियोक्त्यामार्फत त्यांच्या खात्यात जमा केली जाते. पण जर नवीन प्रस्तावाला मंजूरी मिळाली तर सदस्य थेट योगदान देऊ शकतील. याचा प्रत्येकाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

कर आणि इतर अटी अद्याप अस्पष्ट

कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यांनुसार या सुविधेसंबंधित कर नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. सध्या कर्मचारी किती अतिरिक्त रक्कम जमा करू शकतात? त्यासाठी कोणते शुल्क आकारले जाईल? थर्ड पार्टीकडून मिळालेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया काय असेल? हे अस्पष्ट आहे. याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच यावर EPFO कडून निर्णय घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Loss In Men: केस झपाट्याने गळतायत? वेळीच करा या टेस्ट, शरीरातील गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण!

Back Pain : कॅन्सरपेक्षा कंबरदुखी खतरनाक, नेहमीच्या 'या' ५ सवयी ठरतायत धोकादायक

बांगलादेश ताब्यात घेणार! डेडलाईनही ठरली; भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान

आणखी एका राजकीय भूकंपाची चर्चा! मुख्यमंत्र्यांनी हात काढला तर बंडखोर आमदारांचा गट होणार गायब, भाजप नेत्याच्या विधानानं खळबळ

Masala Papdi : बाजारातील पापडी विसरा! गव्हाच्या पिठापासून बनवा कुरकुरीत मसाला पापडी, चहासोबत लागेल भारी

SCROLL FOR NEXT