EPFO Rule Saam Tv
बिझनेस

EPFO: खासगी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन ७५०० होणार? सरकारने स्पष्टच सांगितलं

EPFO Minimum Pension Limit: ईपीएफओ किमान पेन्शनमध्ये वाढ करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. आता सरकारने यावर आपले म्हणणे मांडले आहे.

Siddhi Hande

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी

सरकारचे म्हणणे काय?

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मागील काही महिन्यांपासून ईपीएफओ EPS-95 अंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या तयारीत दिसत आहे. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होऊ शकते. मिडिया रिपोर्टनुसार, ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते. दरम्यान, अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आता EPS-95 अंतर्गत पेन्शनवाढीच्या मागणीबाबत संसेदत प्रश्न विचारण्यात आले होते. १ डिसेंबर २०२५ रोजी सरकारला विचारण्यात आले होते की, किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० करण्याची योजना आहे का? ही मागणी लाखो कर्मचारी करत आहेत.

सरकारला प्रश्न

लोकसभेत खासदास सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी सरकारला ६ प्रश्न विचारले, पेन्शन वाढेल का, पेन्शन वाढत का नाही,महागाई भत्ता का दिला जात नाही, पेन्शनधारकांच्या मागणीचा अभ्यास केला जातो का, ही योजना लागू करण्यासाठी कोणती पाऊले उचलली जात आहेत का?, असे प्रश्न विचारले होते.

EPS-95 आहे तरी काय?

EPS-95 ही देशातील पेन्शन प्रणाली आहे. याअंतर्गत ८ दशलक्षापेक्षा जास्त पेन्शनधारकांना फायदा होतो. यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातील योगदान आणि नियोक्त्याचे योगदान जमा केले जाते. दरम्यान, २०१४ मध्ये किमान पेन्शन १००० रुपये ठेवली होती. जी सध्याच्या महागाईच्या जगात खूप कमी आहे.

पेन्शनधारकांच्या मागण्या

गेल्या १० वर्षात पेन्शनधारकांना अनेक याचिका दाखल केल्या. यामध्ये किमान पेन्शन ७५०० ते ९००० करावी, डीए लागू कराव, अशा मागण्यात केल्या आहेत.

सरकारचे म्हणणे काय?

मंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की, सध्या पेन्शन वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. ईपीएस फंडाच्या आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विचार सुरु नाही. २०१९ च्या मुल्यांकनानुसार, ईपीएफ फंडमध्ये तूट दिसत आहे. भविष्यातील पेन्शन देण्यासाठीही पुरेसे पैसे नाही. त्यामुळे किमान पेन्शन वाढवल्यावर निधीव आणखी ताण येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची आज निवड

Vastu Tips Of Kitchen Wall Colour: किचनच्या भिंतींना चुकूनही हे 3 रंग लावू नका; कुटुंबात होईल कडाक्याचे भांडण

Gold Rate: गूड न्यूज! सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, प्रति तोळा ₹१०००० ने स्वस्त; प्रति तोळा इतक्या रुपयांवर आले; वाचा ताजे दर

Instant Sabudana Khichdi: साबुदाणे भिजवायला विसरलात? अशी बनवा मऊ-मोकळी इंस्टंट खिचडी

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातला धड चालताही येईना, म्हणतो 'ताकद नाही राहिली', पोलिसांसमोर ढसाढसा रडला, VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT