New Rules From Today: टॅक्स, पेन्शन ते LPG गॅसच्या किंमती; आजपासून ६ नियम बदलले

Rule Change From Today 1st December 2025: आज १ डिसेंबरपासून पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. एलपीजी गॅसच्या किंमती घसरल्या आहेत. तसेच अनेक कामांची डेडलाइन उलटून गेली आहे.
New Rules From Today
New Rules From TodaySaam Tv
Published On
Summary

आजपासून या ६ नियमांत बदल

पेन्शन, टॅक्स अन् एलपीजीच्या किंमतीसंबंधित नियम बदलले

पेन्शनच्याही नियमात बदल

डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. २०२५ च्या शेवटच्या महिन्यात अनेक नियम बदलले आहेत. पैशासंबंधित नियमांमध्ये बदल झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. पेन्शनपासून ते एलपीजी गॅसच्या किंमती बदलल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांपासून ते निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम होणार आहे. आजपासून या ६ नियमांमध्ये बदल झाले आहेत.

New Rules From Today
New Rule: LPG ते पेन्शन; १ डिसेंबरपासून महत्त्वाच्या नियमात बदल होणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम

LPG गॅसच्या किंमती घसरल्या (LPG Gas Price Decrease)

आज एलपीजी गॅसच्या किंमती घसरल्या आहेत. व्यावसायिक गॅसच्या किंमतींमध्ये जवळपास १० रुपयांची कपात झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ही किंमत वाढली होती. दरम्यान आजपासून १९ किलो वजनाच्या एलपीजी गॅसची किंमत १५८०.५० रुपये झाली आहे. घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

ATF च्या दरात बदल

दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या किंमती अपडेट होतात. तसेच हवाई इंधन आणि एअर टर्बाइन फ्यूएलच्या किंमतीदेखील जारी केल्या जातात. १ डिसेंबरपासून या किंमती बदल्याचा थेट परिणाम हवाई वाहतूकीवर होणार आहे. याचसोबत आज सीएनजी- पीएनजीच्या दराबाबतही घोषणा होण्याची शक्यता आहे.

UPS ची डेडलाइन

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना यूपीएस पेन्शन निवडण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती. त्यामुळे आजपासून त्यांनी यूपीएस पेन्शन स्कीम निवडता येणार नाही.

लाइफ सर्टिफिकेट

डिसेंबर महिन्यात पेन्शनसंबंधित नियमांमध्येही बदल झाले आहेत. पेन्शनधारकांना ३० नोव्हेंबरपर्यंत लाइफ सर्टिफिकेट जमा करणे अनिवार्य होते. अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही.

New Rules From Today
Government Scheme: निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा, तरुणांसाठी सुरु केली नवी योजना; वाचा सविस्तर

टॅक्ससंबंधित नियम (Tax Rules)

टॅक्ससंबंधितही नियमांमध्ये बदल केले आहे. जर ऑक्टोबरमध्ये तुमचा टीडीएस कापला असेल तर सेक्शन 194-IA, 194-IB, 194M आणि 194S अंतर्गत स्टेटमेंट जमा करावे लागणार होते. यासाठीही ३० नोव्हेंबरची डेडलाइन होती.

बँकांना सुट्ट्या (Bank Holidays December 2025)

रिझर्व्ह बँकेने डिसेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. डिसेंबर महिन्यात १७ दिवस बँका बंद राहणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सणावारानुसार सुट्ट्या असणार आहे.

New Rules From Today
Bank Holiday in December: डिसेंबरमध्ये १९ दिवस बँका राहणार बंद, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com