EPF Calculation Saam Tv
बिझनेस

EPFOची गुडन्यूज! 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार ₹४५०००; काय फायदा होणार?

EPFO Interest Rate Increase: ईपीएफओ कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळू शकते. ईपीएफओ खात्यातील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. जर व्याजदर वाढले तर कोट्यवधी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

Siddhi Hande

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पुढच्या वर्षी पीएफ व्याजदरात वाढ होण्याची शक्यता

पीएफ व्याजदर ९ टक्के होण्याची शक्यता

५ लाखांवर ४५००० रुपये व्याज मिळणार

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकतो. २०२५-२६ वर्षात व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. सरकार यावर्षी पीएफ व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. पीएफवरील व्याजदर ९ टक्के होण्याची शक्यता आहे.

सध्या २०२४-२५ वर्षात व्याजदर ८.२५ टक्के आहे. दरम्यानस हा व्याजदर ०.७५ टक्के वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रस्ताव मंजूर होण्याच्या वाटेवर आहे.हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ७.५ कोटी ईपीएफ कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. दरम्यान, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कोणाला मिळणार लाभ?

जर तुमच्या पीएफ खात्यात ५ लाख रुपये असतील तर तुम्हाला त्यावर ४५००० रुपयांचे व्याज मिळणार आहे. ४ लाख रुपयांवर ३६,००० रुपयांचे व्याज मिळणार आहे. ३ लाखांचा पीएफ असेल तर त्यावर २७,००० रुपयांचे व्याजदर मिळणार आहे.

अहवालानुसार, ईपीएफओला हा प्रस्ताव देण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात हा प्रस्ताव मंजुर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त जमा केली जाणार आहे. यामुळे कोट्यवधी नोकरदारांना फायदा होणार आहे.

ईपीएफओ खात्यात व्याज जमा झाले की नाही अशा पद्धतीने करा चेक

सर्वात आधी तुम्हाला ईपीएफओ पोर्टलवर जायचे आहे. यानंतर UAN नंबर टाकायचे आहे.

यानंतर तुम्हाला यूएएन नंबर टाकून पासवर्ड टाकायचा आहे. यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन करा.

यानंतर तुम्हाला Passbook Lite या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तिथे तुम्हाला पीएफ बॅलेन्स दिसणार आहे.

ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या खात्यात दरवर्षी व्याजाची रक्कम जमा करते. यावर्षी ८.२५ टक्के व्याजदर आहे. पुढच्या वर्षी व्याजदर किती असणार याबाबत कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT