EPFO Update google
बिझनेस

EPFO Update: महत्वाची बातमी! PF काढण्याचे नियम बदलले, हा फॉर्म भरला नाही तर पैसे अडकणार?

PF Withdrawal : EPFO ने आता PF काढण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. यामध्ये तुम्हाला जुन्या प्रोसेस फॉलो कराव्या लागणार नाहीत. तसेच फॉर्म 15G/15H सुद्धा भरावे लागणार नाहीत.

Sakshi Sunil Jadhav

सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने(EPFO) अनेक महत्वाचे केले आहेत. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना पीएफ काढताना आता वेगळा फॉर्म भरावा लागणार आहे. PF खाते धारकांना यापुर्वी १५ जी आणि १५ एच हे फॉर्म भरुन पीएफचे पैसे खात्यातून काढता यायचे आता यामध्ये महत्वाचा बदल करण्यात आला आहे. म्हणजेच तुम्हाला हे दोन फॉर्म भरण्याची गरज नाही.

EPFOने आता सर्व वयोगटातल्या नोकरदारांसाठी १२१ भरणं अनिवार्य केलं आहे. म्हणजेच आता कर्मचाऱ्यांना पीएफ काढताना फॉर्म १५ जी आणि १५ एच ऐवजी १२१ फॉर्म भरणं अनिवार्य असणार आहे. ही बातमी जेष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. यामध्ये आधी पीएफच्या रकमेवर टीडीएस आकारला जात नव्हता. आता या दोन्ही फॉर्मटी अट रद्द केली आहे. तसेच १२१ हा एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरणं अनिवार्य केलं आहे.

बदलत्या नियमांनुसार, हा फॉर्म भरल्याने ज्या कर्मचाऱ्यांचं वार्षिक उत्पन्न कर मर्यादेपेक्षा कमी आहे आणि त्यांना आता नव्या आर्थिक वर्षात कर भरण्याची आवश्यकता नाही. हा फॉर्म फक्त पीएफसाठीच नाही तर बॅंकेच्या इतर कामांसाठीही वापरा जाणार आहे.

कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, ज्यांचं पीएफ खातं जुनं आहे आणि बरेच काळ बंद आहे. त्यांना आता ते खातं सुरु करता येणार आहे. पुर्वी UNA नंबर नसल्याकारणाने जुन्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पीफचे खाते वापरता येत नव्हते. मात्र आता ही समस्या सुटली आहे. तुम्ही फक्त तुमच्या आधारच्या माहितीवरुन तुमचं खातं पुन्हा अॅक्टीव्ह करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT