EPFO  Saam Tv
बिझनेस

ELI Scheme: EPFO चा लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा! UAN अ‍ॅक्टिव्ह करण्याची डेडलाइन वाढवली

EPFO UAN Activation Deadline Extended: ईपीएफओने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता UAN अ‍ॅक्टिव्ह करण्याची डेडलाइन वाढवली आहे.

Siddhi Hande

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. ईपीएफओने युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) अॅक्टिव्ह करण्यासाठी आणि आधार सीडिंग करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. आता तुम्ही ३० जून २०२५ पर्यंत यूएएन अॅक्टिव्हेट करु शकतात. याआधी ही तारीख ३१ मे होती.

ईपीएफओच्या या निर्णयामुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्ट वर्कर्संना दिलासा मिळाला आहे. ज्यांनी आतापर्यंत यूएएन नंबर अॅक्टिव्हेट केले नाही त्यांनी लवकरात लवकर करावे.यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना ELI (Employee's Life Insurance)योजनेचा फायदा मिळवण्यासाठी अधिकचा वेळ मिळेल.

काय आहे ELI योजना?

Employee's Life Insurance योजना ही कर्मचाऱ्यांसाठी जीवन विमा सुरक्षा आहे. या योजनेअंतर्गत जर कोणत्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याचा विमा नॉमिनीला दिला जातो.

ही रक्कम जास्तीत जास्त ७ लाखांपर्यंत असते. या योजनेचा लाभ फक्त तेच कर्मचारी घेऊ शकतात. ज्यांचा UAN नंबर अॅक्टिव्ह आहे आणि हा नंबर आधार कार्डशी लिंक आहे.

UAN नंबर महत्त्वाचा

EPF किंवा EDLI दावा करण्यासाठी काही अटी आहेत. यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे यूएएन नंबर अॅक्टिव्ह असणे. या नंबरमुळे कर्मचाऱ्याची पूर्ण माहिती मिळते.यामुळे तुम्हाला पेन्शन, पीएफ आणि इतर अनेक दाव्यांसाठी फायदा होणार आहे.

UAN नंबर कसा अॅक्टिव्ह करायचा? (How To Activate UAN Number)

सर्वात आधी तुम्हाला यूएएनच्या वेबसाइटवर जावे लागणार आहे.

यानंतर अॅक्टिव्हेट यूएएन लिंकवर क्लिक करावे लागणार आहे.

यानंतर तुमचा यूएएन नंबर, जन्मतारीख, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.

यानंतर लॉगन क्रेडेंशियल सेट करायचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

Maharashtra Live News Update: ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याचा व्हिडिओ, वनविभागाकडून खुलासा

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

Crime News : संतापजनक! क्लासवरून घरी येताना वाटेत गाठलं, ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार, नांदेड हादरलं

SCROLL FOR NEXT