PF Transfer: नोकरी बदल्यानंतर PFचा पैसा ट्रान्सफर करण्याचं टेन्शन मिटलं; EPFOनं बदलला 'हा' नियम

EPFO News: ईपीएफओनं कर्मचाऱ्यांना दिलासा दिलाय. नोकरी बदल्यानंतर जुन्या कंपनीच्या पीएफ अकाउंटमधील पैसा ट्रान्सफर करण्यास अनेक समस्या येत असतात. ही समस्या ईपीएफओनं दूर केली आहे.
PF Transfer
EPFO New Update
Published On

खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांसाठी ईपीएफओनं एक आनंदाची बातमी दिलीय. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएफ हे वृद्धपकाळातील एक भरोसाची सेव्हिंग असते. खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी बऱ्याच वेळा कामसाठी कंपनी बदलत असतात. त्यावेळी जुन्या कंपनीच्या पीएफचा पैसा ट्रान्सफर करण्यासाठी मोठी समस्या होत असते. ईपीएफओनं कर्मचाऱ्यांना येणारी ही समस्या दूर केलीय. पीएफ हस्तांतरणाची प्रक्रिया आधीपेक्षा सोपी झालीय.

आता कर्मचाऱ्यांच्या मागील आणि पुढील नोकरीतील सेवा कालावधीत काही किरकोळ ओव्हरलॅपिगमुळे तुमचा पीएफ ट्रन्सफर करण्याचा अर्ज नाकारला जाणार नाही. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. जेव्हा कर्मचारी नोकरी बदलतात. तेव्हा ते त्याच्या जुन्या नियोक्त्याच्या ईपीएफ खात्यातून नवीन नियोक्त्याच्या ईपीएफ खात्यात शिल्लक हस्तांतरित करू शकतो.

PF Transfer
Post Office Saving Schemes: एक नंबर स्किम आहे भावा! ५ वर्षात व्हाल मालामाल, जाणून घ्या श्रीमंत होण्याचा मंत्र

याला हस्तांतरण (ट्रान्सफर क्लेम) दावा म्हणतात. परंतु अनेकदा असे घडते की जुन्या आणि नवीन नियोक्त्याच्या सेवा तारखा ओव्हरलॅप होत असते. त्यामुळे ट्रान्सफर क्लेम रिजेक्ट होत असतो. याबाबत, ईपीएफओने नवीन नियम केलाय. आता केवळ दोन कंपन्यांच्या सेवा तारखांमध्ये ओव्हरलॅप असल्याने हस्तांतरणाचा म्हणजेच ट्रान्सफरचा दावा नाकारला जाणार नाही.

PF Transfer
ITR फॉर्म भरल्यानंतरची एक चूक पडेल महागात, गमवाल रिफंड; जाणून घ्या नियम

जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार, जर कोणत्याही हस्तांतरण दाव्यात ओव्हरलॅपिंग तारखा आढळल्या तर प्रादेशिक कार्यालय ट्रान्सफरचा दावा नाकारू शकत नाहीत. जर कंपनीने ट्रान्सफर क्लेम नाकारला तर त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल. यासाठी, हस्तांतरण कार्यालयाला दावा परत करणं किंवा नाकारणं याप्रकरणांमध्ये उत्तर द्यावं लागेल.

ज्या प्रकरणांमध्ये अतिव्यापी परिस्थिती समजून घेणे खरोखर आवश्यक आहे अशा प्रकरणांमध्येच प्रतिसाद मागितले पाहिजेत आणि आवश्यक माहिती मिळवल्यानंतर दाव्यावर प्रक्रिया केली पाहिजे, असं ईपीएफओनं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com