ईपीएफओने मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफओच्या एका निर्णयामुळे ७.५ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये पीएफ काढण्याची ऑटो क्लेम लिमिट वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय ५ लाखांपर्यंतचे पैसे काढू शकतात.याआधी फक्त १ लाख रुपयांची ऑटो क्लेम व्हायचा. दरम्यान, आता ही लिमिट वाढवण्यात आली आहे.
आता तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय पीएफमधून ५ लाख रुपये काढू शकणार आहेत. याचसोबत तुमचे ऑटो क्लेम फक्त ३-४ दिवसांमध्ये होणार आहे. याआधी ऑटो सेलटमेंटसाठी १० दिवसांचा कालावधी लागायचा. आता हे कामदेखील लवकर होणार आहे.
ईपीएफओने लग्न, उच्च शिक्षण, घर खरेदीसाठी पीएफ ऑटो क्लेम करण्याची परवानगी दिली आहे. याआधी फक्त वैद्यकीय उपचारासांठी पीएफ ऑटो क्लेम करण्याची परवानगी दिली आहे.
ईपीएफओने वाढवली लिमिट
ईपीएफओने (EPFO) एप्रिल २०२० मध्ये ऑटो क्लेमची सुविधा सुरु केली होती. सुरुवातीला फक्त ५०,००० रुपयांपर्येत तुम्ही ऑटो क्लेम करु शकत होत्या. त्यानंतर ही लिमिट वाढवून १ लाख रुपये करण्यात आली. यानंतर आता तुम्ही ५ लाखांपर्यंत ऑटो क्लेम करु शकतात.
याबाबत श्रम व रोजगार मंत्रालयाचे सचिव सुमिता डावरा यांनी माहिती दिली आहे. पीएफ क्लेमच्या रिजेक्शन रेटमध्ये घट होताना दिसत आहे. याआधी ५० टक्के क्लेम रिजेक्ट व्हायचे मात्र ही संख्या आता कमी झाली आहे. आता फक्त ३० टक्के क्लेम रिजेक्ट होत आहेत. ईपीएफओने पीएफच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफ क्लेम करणे अधिक सोपे होणार आहे.
आता UPI आणि ATM मधून काढता येणार पीएफचे पैसे
आता लवकरच यूपीआय आणि एटीएममधून तुम्ही पीएफचे पैसे काढू शकणार आहात.यामुळे पैसे काढणे अधिक सोपे होणार आहेत. तुम्ही यूपीआयमधून १ लाख रुपये ट्रान्सफर करु शकतात. तुम्ही तुमच्या कोणत्याही बँकेत हे पैसे ट्रान्सफर करु शकतात. ही प्रोसेस ऑटोमेटेड असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.