EPFO Rule Saam Tv
बिझनेस

EPFO Rule: EPFOचे ८ नियम बदलले; कर्मचाऱ्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम

EPFO Rule Change: ईपीएफओने पीएफच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. यामध्ये पेन्शनपासून ते पीएफ काढण्यासाठीच्या नियमांचा समावेश आहे. यामुळे थेट कर्मचाऱ्यांवर परिणाम होतो.

Siddhi Hande

EPFO च्या नियमांत बदल

मागील १० महिन्यात ८ नियम बदलले

पेन्शनपासून ते पीएफ काढण्यासाठी नवीन नियम

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातून एक ठरावीक रक्कम जमा केली जाते. ईपीएफओद्वारे पीएफ अकाउंट चालवले जाते. दरम्यान, ईपीएफओने आपल्या काही नियमात बदल केले आहेत. याचा थेट परिणाम पेन्शन, रिटायरमेंट फंडवर होतो. दरम्यान, मागील १० महिन्यात ईपीएफओने ८ महत्त्वाच्या नियमात बदल केले आहेत.

१. जास्त पेन्शनचा ऑप्शन (Pension Calculation)

ईपीएफओच्या नियमांनुसार पेन्शनचे कॅल्क्युलेशन बदलले आहे. याआधी पेन्शन तुमच्या शेवटच्या पगारावर आधारित असायची. परंतु आता सेवानिवृत्तीच्या आधीच्या ६० महिन्यांच्या पगारावर पेन्शन ठरवली जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.

२. पीएफचे पैसे काही मिनिटात काढता येणार (PF Withdrawal)

ईपीएफओने लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही घराचे बांधकाम करण्यासाठी, मुलांच्या लग्नासाठी, मेडिकल इमपजन्सी अशा अनेक कामांसाठी अॅडव्हान्स पैसे काढू शकतात. यासाठी ईपीएफओ ऑटो सेटलमेंट सिस्टीम सुरु केली आहे. यामुळे तुमचे काम काही मिनिटात होईल.

३. पूर्ण पैसे काढू शकतात

ईपीएफओने पीएफ काढण्याच्या नियमात बदल केले आहे. आता तुम्ही काही ठरावीक परिस्थितींमध्ये १०० टक्के पीएफ काढू शकतात. यामध्ये कर्मचारी आणि नियोक्त्यांचे पैसे असतात.दरम्यान, खात्यात रिटायरमेंटसाठी आवश्यक २५ टक्के रक्कम तशीच असेल.

४. पेन्शन

आता सरकारने पेन्शनच्या नियमांत बदल केले आहेत. आता पेन्शनची कमाल मर्यादा ७५०० वरुन वाढवून १५,००० करण्यात आली आहे.

५. एटीएममधून पीएफ काढता येणार

आता तुम्ही एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकणार आहात. ईपीएफओने ऑनलाइन क्लेम प्रक्रिया खूप सोपी केली आहे.

६. पैसे करता येणार ट्रान्सफर

नोकरी बदलल्यानंतर जुन्या पीएफ अकाउंटमधून नवीन अकाउंट ट्रान्सफर करणे हे खूप अडचणीचे काम आहे. त्यानंतर ईपीएफओने ऑटो-ट्रान्सफर सुविधा अधिक मजबूत केली आहे.

७. ई नॉमिनेशन अनिवार्य

आता ईपीएफओ सदस्यांना ई नॉमिनेशन करणे गरजेचे आहे. पीएफ खातेधारकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना नॉमिनी करणे गरजचेचे आहे. यामुळे जर पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला पैसे मिळणे सोपे होईल.

८. यूएएन आधार लिंक

पीएफ खातेधारकांना यूएएन आणि आधार लिंक असणे गरजेचे आहे.जर तुम्ही यूएएन लिंक केले नाही तर तुम्हाला पीएफ खात्यात पैसे जमा करता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT