Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

Government Employee : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता २० वर्षांच्या सेवेवर पूर्ण पेन्शन मिळणार आहे.
Government Employee Pension
Government Employee Pensionx
Published On
Summary
  • सरकारी कर्मचाऱ्यांना आता २० वर्षांच्या सेवेवर पूर्ण पेन्शन मिळणार.

  • दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठी भेट.

  • यूपीएस योजनेत पेन्शनसह कुटुंबासाठीही सुरक्षित लाभ.

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता २० वर्षांच्या सेवेवर पूर्ण पेन्शन मिळणार आहे. दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार, आता यूपीएस अंतर्गत २० वर्षांच्या सेवेवरही पूर्ण पेन्शन मिळणार आहे. यूपीएस निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनशिवाय इतर अनेक सुविधा देखील मिळणार आहेत. एखादा कर्मचारी सेवेदरम्यान अपंग झाला किंवा कोणत्या कारणाने त्याचा मृत्यू झाला. तर मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला सीसीएस पेन्शन नियम किंवा यूपीएस नियमांनुसार पर्याय निवडण्याचा अधिकार असेल. यामुळे कुटुंबाला सुरक्षित पेन्शनचा लाभ मिळू शकेल.

केंद्र सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने युनिफाइड पेन्शन योजनेशी संबंधित नियम अधिसूचित केले आहे. नव्या योजनेअंतर्गत, आता कर्मचाऱ्यांना २० वर्ष नियमित सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्तीचा लाभ मिळेल. त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल. पूर्वी २५ वर्षांची मर्यादा होती. ही मर्यादा आता वाढवून २० वर्षांपर्यंत करण्यात आली आहे.

Government Employee Pension
Air India Plane : एअर इंडियाच्या विमानात बिघाड, हवेत असताना पायलटने दिला सिग्नल, अन् पुढे...

यूपीएस निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनशिवाय इतर अनेक सुविधा देखील मिळताली. जर एखादा कर्मचारी सेवेदरम्यान अपंग झाला किंवा काही कारणास्तव त्याचा मृत्यू झाला, तर (अपंगत्वाच्या बाबतीत कर्मचारी) कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला सीसीएस पेन्शन नियम किंवा यूपीएस नियमांनुसार पर्याय निवडण्याचा अधिकार असेल. यातून सुरक्षित पेन्शनचा लाभ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळेल.

Government Employee Pension
Actor Death : लोकप्रिय अभिनेत्याचे निधन, वयाच्या ५५ व्या वर्षी मालवली प्राणज्योत

केंद्र सरकारने १ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रीय पेन्शन योजनेला पर्याय म्हणून यूपीएस योजना लागू केली. कर्मचारी आणि सरकार दोघेही या योजनेमध्ये योगदान देतात. नोंदणी किंवा योगदान जमा होण्यास विलंब झाल्यास, सरकार कर्मचाऱ्यांना भरपाई देखील देते. कर्मचारी त्यांच्या निवृत्तीच्या एक वर्ष आधी किंवा व्हीआरएस घेण्याच्या ३ महिने आधी ही योजना निवडू शकतात.

Government Employee Pension
Pune : पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर, NCP नगरसेवकाच्या हत्या प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा खून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com