
दिल्ली-इंदौर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात हवेत बिघाड झाला.
पायलटने पॅन-पॅन कॉल देऊन आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली.
विमान इंदौर विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले, सर्व प्रवासी सुरक्षित.
Air India Express Airplane : दिल्लीहून इंदौरला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात हवेतच बिघाड झाला. पायलटने पॅन-पॅन कॉल देऊन विमानाच्या परिस्थितीची माहिती सांगितली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दिल्ली-इंदौर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात शुक्रवारी (५ सप्टेंबर) हवेत असताना बिघाड झाला. त्यानंतर पायलटने पॅन-पॅन कॉल करुन आपत्कालीन परिस्थिती दर्शवली. विमान इंदौरमधील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, IX 1028 हे विमान सकाळी ९.३५ वाजता उतरणार होते. पण ते सकाळी ९.५५ वाजता उतरले अशीमाहिती अधिकाऱ्यांनी दिली. तांत्रिक समस्येची तक्रार आल्यानंतर सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आल्याचे विमानतळ संचालक विपिनकांत सेठ यांनी सांगितले. सर्व प्रवासी, कर्मचारी सुखरुप असून कोणतीही हानी झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पॅन-पॅन सिग्नल म्हणजे नक्की काय?
इंजिनमध्ये समस्या आढळल्यानंतर पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोलला पॅन-पॅन अलर्ट जारी केला जातो. हा विमान वाहतूक आणि सागरी दळणवळणात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सिग्नल आहे. जर तातडीची पण जीवघेणी नसलेली परिस्थिती असेल, तेव्हा पॅन-पॅन अलर्ट दिला जातो. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित कराताना एटीसी आणि ग्राउंड सर्व्हिसेसना त्वरीत मदत पुरवता येते.
पायलटने दिलेल्या सिग्नलनंतर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी मानक कार्यवाही प्रक्रिया सक्रीय केली. या कार्यवाही प्रक्रियेत आपत्कालीन प्रतिसाद पथकांना एकत्रित केले जाते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातून सिग्नल मिळाल्यानंतर झालेल्या त्वरीत कारवाईमुळे विमान कोणत्याही त्रास किंवा अडथळ्याविना सुरक्षितपणे नेण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.