EPFO 3.0 Saam Tv
बिझनेस

EPFO 3.0 लाँन्च होण्यास का होतोय विलंब? कोणत्या पाच नियमात होतील बदल? जाणून संपूर्ण माहिती

EPFO 3.0 New Digital Platform: EPFO 3.0 हे एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे नोकरी धारकांसाठी आणले जातंय. हे प्लॅटफॉर्म तांत्रिक त्रुटी दूर करणार आहे.

Bharat Jadhav

  • EPFO 3.0 हे नवे डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच होण्यात विलंब झालाय.

  • तांत्रिक त्रुटींमुळे ही अडचण निर्माण झाली आहे.

  • या प्लॅटफॉर्ममुळे पाच मोठ्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.

कर्माचारी भविष्य निधी संघटना लवकरच मोठे बदल करणार आहे. अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल यांनी याबद्दल संपूर्ण माहिती दिलीय.ईपीएफओशी संबंधित अडथळे दूर करण्यासाठी हे बदल केले जात आहेत. या बदलामुळे लाखो पीएफ खात्यांच्या सेवा जलद होतील आणि नोकरी करणाऱ्यांनाही दिलासा मिळेल.

यासोबतच अकाउंट होल्ड्समध्ये प्रवेश करणे सोपे होईल. त्यांच्यासाठी एक वेगळी रचना देखील तयार केली जाणार आहे. ईपीएफओ 3.0चे लाँचिंग जूनमध्येच होणार होते, परंतु तांत्रिक चाचणीमुळे त्याला विलंब होत आहे. सध्या याबाबत कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाहीये. अधिकाऱ्यांच्या मते, ते लवकरच सुरू केले जाईल.

एटीएम आणि यूपीआय मधून सहज पैसे काढता येतील

ईपीएफओ ३.० सदस्य त्यांचे आधार आणि बँक खाते त्यांच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) शी लिंक केल्यानंतर एटीएममधून थेट पैसे काढू शकतील. याशिवाय UPI च्या मदतीने पैसे काढणे देखील शक्य आहे. आपत्कालीन परिस्थितीत पैशांची आवश्यकता असली तरी काम लवकर होईल. यासाठी तुम्हाला कोणतेही कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत.

दुरुस्ती आणि दाव्याची सुविधा

नवीन प्रणालीमुळे ईपीएफओ सदस्यांना अनावश्यक नियमांना समोरे जावे लागणार नाही. ओटीपी पडताळणी वापरून अपडेट्स किंवा दुरुस्त्या ऑनलाइन करता येतील. ज्यामुळे कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. प्रगत तंत्रज्ञानामुळे त्यावर लक्ष ठेवणे खूप सोपे होणार आहे.

कर्जाचा दावा मिळण्यास सुलभता

कर्जाच्या दाव्याच्या निपटारामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलाय. ईपीएफओ ३.० अंतर्गत अल्पवयीन मुलांच्या बाबतीत नामनिर्देशित व्यक्तीला पालकांचे प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नसणार आहे. कुटुंबाला कोणत्याही अडचणीशिवाय लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी हा त्याचा उद्देश आहे.

मोबाईलवर नवीन अपडेट्स

बहुतेक लोक सर्व काम त्यांच्या फोनवर करतात, यासाठी EPFO ​​3.0 मोबाइल-फ्रेंडली बनवले जातंय. आता प्रत्येक सदस्य त्यांच्या सोयीनुसार कुठेही जमा केलेले पैसे, खात्यातील शिल्लक आणि पैशांशी संबंधित दावे सहजपणे तपासू शकतील. ईपीएफओ सुरू झाल्यामुळे, बऱ्याच काळापासून रखडलेले काम लवकरच सुधारल्या जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT