EPFO 3.0 google
बिझनेस

EPFO 3.0: ATM मधून ५ मिनिटांत काढा PFचे पैसे ; कशी असेल प्रोसेस? वाचा संपूर्ण माहिती

PF Withdrawal Steps : EPFO 3.0 अंतर्गत आता ATM आणि UPI द्वारे PF पैसे काढणे सोपे होणार आहे. UAN, KYC पूर्ण करून सदस्यांना जलद, सुरक्षित आणि सुलभ पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

EPFO 3.0 ही नवीन प्रणाली आहे

PF पैसे ATM आणि UPI द्वारे काढण्याची नवी सुविधा

UPI आयडी PF खात्याशी लिंक करून पैसे ट्रान्सफर करता येतील

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. तुम्हाला आता ATM मधून तुमचा PF सहज काढता येणार आहे. ही प्रोसेस सगळ्यात सोपी आहे. जी प्रोसेस तुम्ही रोजच्या डिजीटल व्यवहारासाठी वापरता, तशाच पद्धतीची ही प्रोसेस असणार आहे. या नव्या सुविधेमुळे आता ATM आणि UPI च्या माध्यमातून थेट पीएफचे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे आधीासारखं बँकांच्या रांगा किंवा EPFO कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी होईल.

EPFO 3.0 अंतर्गत सदस्यांना एक विशेष PF ATM कार्ड दिलं जाऊ शकतं. या कार्डाच्या मदतीने कोणत्याही ATM मधून PIN किंवा OTP वापरून तुम्ही पैसे काढू शकता. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांचा UPI आयडी पीएफ खात्याशी लिंक करता येणार आहे. त्यानंतर EPFO पोर्टल किंवा UMANG अॅपच्या माध्यमातून थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळेल. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया बँकिंगसारखी फास्ट आणि सोपी होईल.

कर्मचाऱ्यांना या सुविधांचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणं आवश्यक असेल. कर्मचाऱ्यांकडे अॅक्टीव्ह Universal Account Number (UAN) असणं बंधनकारक असेल. तसेच, UAN शी जोडलेला मोबाईल नंबर चालू असणं गरजेचं आहे. KYC प्रक्रिया पूर्ण असणंही गरजेचे आहे. ज्यामध्ये आधार, पॅन, बँक खातं याची माहिती आणि IFSC कोड जोडलेला असणं आवश्यक आहे. या नव्या प्रणालीमध्ये पैसे काढण्यावर काही मर्यादा ठेवण्यात येणार आहेत.

सदस्यांना त्यांच्या एकूण PF शिल्लक रकमेपैकी सुमारे 50 ते 75 टक्के रक्कम ATM किंवा UPI च्या माध्यमातून काढता येईल. ही मर्यादा भविष्यातल्या गरजांसाठी काही निधी शिल्लक राहावा यासाठी ठेवण्यात आली आहे. लग्नासाठी पाच वेळा आणि शिक्षणासाठी दहा वेळा अंशतः पैसे काढण्याची परवानगी दिली जाईल. नोकरी गेल्यानंतर एका महिन्यानंतर सदस्यांना 75 टक्क्यांपर्यंत निधी काढता येईल. तसेच ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाख रुपयांवरून वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे प्रक्रिया जास्त जलद होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT