मुंबई ते पुणे प्रवास अधिक वेगवान, मुंबईहून ४८ मिनिटात पुण्यात पोचणार

Mumbai–Pune Bullet Train to Cut Travel Time to Just 48 Minutes: केंद्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पांसाठी तरतूद केली होती. आता त्यापैकीच एक असलेल्या मुंबई-पुणे बुलेट ट्रेन प्रकल्पाची रेल्वेमंत्र्यांनी घोषणा केलीये. मात्र पुणे- मुंबई बुलेट ट्रेनमुळे प्रवास कसा सुखकर होणार आहे? तो कसा पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Proposed Mumbai–Pune Bullet Train to reduce travel time to just 48 minutes and boost connectivity
Proposed Mumbai–Pune Bullet Train to reduce travel time to just 48 minutes and boost connectivitySaam tv
Published On

यापुढे मुंबईहून निघालात की अवघ्या ४८ मिनिटात तुम्ही पुण्यात पोचाल..खरं नाही वाटत पण हे प्रत्यक्षात येणार आहे कारण आता मुंबई ते पुणे बुलेट ट्रेन सुरू होणार असल्याची .घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केलीय. दरम्यान, मुंबई-पुणे बुलेट ट्रेन प्रकल्प नेमका काय आहे पाहूयात...

मुंबई-पुणे बुलेट ट्रेन प्रकल्प

मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे मुंबई आणि पुणे twin सिटीज' बनतील. या दोन शहरांमधील प्रवास अवघ्या 48 मिनिटांवर येईल

सुरुवातीला मुंबई-पुणे दरम्यान दर एका तासाने बुलेट ट्रेन धावेल. नंतर ही वारंवारता 15 ते 30 मिनिटांवर आणली जाईल

खरंतर, देशात बुलेट ट्रेनचं जाळं वेगानं विस्तारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं 7 नव्या हायस्पीड रेल कॉरिडोरची घोषणा केली होती. त्यापैकीच एक असलेल्या मुंबई-पुणे बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा आता रेल्वेमंत्र्यांनी केलीये. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवासादरम्यान वाहतुक कोंडीचा सामना करणाऱ्यांना आता बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com