भिवंडी हादरली! चिकन शाओर्मा, पिझ्झा खाल्ल्याने १४ जणांना विषबाधा; अचानक उलट्यांचा त्रास अन्...

food poisoning after eating chicken shawarma : भिवंडीतील खांडूपाडा परिसरात चिकन शाओर्मा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर १४ जणांना अन्नातून विषबाधा झाली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 Chicken shawarma
Chicken shawarma food poisoningsaam Tv
Published On

Bhiwandi Food Poisoning, Chicken Shawarma : भिवंडी शहरातील खांडूपाडा परिसरात चिकन शाओर्मा (शोरमा), पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ६ सदस्यांसह एकूण १४ जणांना अन्नातून विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बाधित रुग्णांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने, त्यांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकांनी खांडूपाडा परिसरातील 'फेमस शोरमा' नावाच्या दुकानातून चिकन शाओर्मा आणि पिझ्झा खरेदी करून गुरुवारी रात्री घरी नेऊन खाल्ला होता. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळपासूनच काहींना अस्वस्थ वाटू लागले.

 Chicken shawarma
Today Horoscope : वृश्चिक राशीसाठी तिप्पट लाभाचा महासंयोग, मकर-मीन राशीत प्रेमाचा वर्षाव; जाणून घ्या तुमचे भविष्य

दुपारपर्यंत हा त्रास अधिक वाढल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्या रुग्णांना उलट्या, पोटदुखी, मळमळ, जुलाब आणि अशक्तपणा अशी लक्षणे जाणवत होती. रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार ही अन्नातून विषबाधा असल्याचे सांगितले.

 Chicken shawarma
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

बाधितांमध्ये ६ पुरुष, ६ महिला आणि २ लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस तातडीने रुग्णालयात आणि घटनास्थळी दाखल झाले. विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून तपास सुरू करण्यात आला असून, संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने (सॅम्पल्स) लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शांतीनगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com