PF Withdrawal Rules atm and upi google
बिझनेस

EPFO 3.0: कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! UPI मधून पीएफचे किती पैसे काढता येतात? वाचा EPFOचे नियम

PF Withdrawal Rules: तुम्ही जर दरमहिन्य़ाला तुमचा पीएफ जमा करून ठेवत असाल तर पुढील माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. यामध्ये पीएफचे पैसे किती काढता येतील याची माहिती देण्यात आली आहे.

Sakshi Sunil Jadhav

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. यातील डिजिटल प्लॅटफॉर्म EPFO 3.0 सुरु करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना काही सेंकदात त्यांच्या पीएफची रक्कम काढता येणार आहे. मात्र तुम्ही तुमचा पीएफ किती काढू शकता आणि त्याचे नियम काय आहेत? याबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे.

प्रत्येक कर्मचारी त्याच्या पगारातला काही भाग हा भविष्यात आर्थिक अडचणी येऊ नये म्हणून जमा करत असतं. EPFOमध्ये गेल्या काही वर्षांपासून कर्मचारी पगारातला छोटा भाग जमा करतात. हाच पीएफ तुम्हाला रिटायरमेंटनंतर पेन्शन म्हणून वापरता येतो. शिवाय तुम्ही हे पैसे तुमच्यासोयीनुसार काढू शकता. पुर्वी हेच पैसे काढण्यासाठी बॅंकेत रांगा लावाव्या लागायच्या. आता तुम्हाला तुम्हाला हेच पैसे UPIचा मदतीने किंवा ATM मधून काढता येणार आहेत.

तुम्ही ATM मधून किती पैसे काढू शकता?

EPFO ​​3.0 अंतर्गत नियमांनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या EPF रकमेच्या ५०% ते ७५% रक्कम युपीआय किंवा एटीएमने काढता येते. कर्मचाऱ्यांना यामध्ये संपूर्ण PF एकाचवेळी काढण्याची परवानगी दिली जात नाही. यामध्ये तुम्हाला भविष्यातसुद्धा संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी देण्याची शक्यता कमी आहे. कारण पीएफचा काही भाग रिटायरमेंटसाठी ठेवला जातोय त्याचा वापर तुम्हाला तेव्हा करता येईल.

EPFO ​​3.0 चे पैसे काढण्याचे नियम

कर्मचारी युपीआय आणि एटीएमच्या मदतीने त्यांच्या एकूण ईपीएफ रकमेच्या ५० ते ७५ टक्के रक्कम काढू शकतात. पण यामध्ये तुमच्या खात्यात एकूण ईपीएफची रक्कम २५% रक्कम ठेवणं बंधनकारक आहे. रिटायरमेंटनंतर तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जाता न यावं यासाठी हा महत्वाचा नियम लागू केला गेला आहे. तसेच सेल्‍फ सेटलमेंट लिमिट ही १ लाखावरुन ५ लाखांपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच आता ५ लाखांपर्यंतची रक्कम तुम्ही काढू शकता.

कोणत्या परिस्थितीत तुम्हाला पीएफचे पैसे काढता येतात?

तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी जाणवल्या काही आपत्कालीन परिस्थिती आली, उच्च शिक्षणाचा खर्च लागला, लग्नाचा खर्च आणि घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी पीेएफचा आपत्कालीन निधी काढता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT