EPFO 3.0 Update google
बिझनेस

EPFO 3.0 मुळे PF आणि पेन्शनची कामे होणार अधिक सोपी; वाचा हे 7 महत्त्वाचे बदल

PF Claim : EPFO 3.0 मुळे पीएफ क्लेम, खाते ट्रान्सफर, पेन्शन सेवा आणि डिजिटल सुविधा जास्त सोपी आणि जलद होणार आहे. नोकरदारांना वेळ,मेहनत आणि कागदपत्रांची धावपळ कमी होईल.

Sakshi Sunil Jadhav

नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) भरत असेल्या कर्मचाऱ्यांसाठी EPFO 3.0 ही खूप दिलासायक ठरणार आहे. या नवीन व्यवस्थेमध्येमुळे पीएफ क्लेम, खातं ट्रान्सफर, पेन्शन आणि इतर बऱ्याच सेवा जास्त जलद आणि सुलभ होतील. डिजिटल सुविधांवर भर दिल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यालयाच्या धावपळीतून सुटका होणार आहे.

PF क्लेम लवकर मिळणार

EPFO 3.0 मध्ये पात्र आगाऊ पीएफ क्लेम तीन दिवसांच्या आत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच ऑटो-सेटलमेंटची मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मेडिकल किंवा इतर तातडीच्या गरजांसाठी निधी लवकर मिळू शकतो.

मोबाईलवरत PFची माहिती

युनिफाइड मेंबर पोर्टल आणि UMANG अॅपच्या मदतीने उरलेला पीएफ, पासबुक, क्लेम स्टेटस आणि पैसे काढण्याची माहिती सहज पाहता येणार आहे.

पेन्शनधारकांना दिलासा

EPS पेन्शनधारकांना आता कोणत्याही EPFO कार्यालयात लाइफ सर्टिफिकेट जमा करता येईल. तसेच Jeevan Pramaan Face App आणि Aadhaar FaceRD App च्या मदतीने घरबसल्या डिजिटल लाइफ सर्टिफिकेटही सादर करता येणार आहे. केंद्राच्या डेटाबेसमुळे नोकरी बदलल्यानंतर पीएफ खाते नव्या कंपनीशी सहज जोडले जाईल. त्यामुळे ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक वेगवान होईल.

मेडिकल किंवा इतर आवश्यक कारणांसाठी पीएफ मधून पैसे काढण्याची प्रोसेस जास्त सोपी करण्यात आली आहे. मात्र सतत पैसे काढल्याने निवृत्ती निधीवर परिणाम होऊ शकतो.

कागदपत्रांची धावपळ कमी

अनेक सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार असल्यामुळे कार्यालयात जाण्याची गरज कमी होईल. त्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्हीची बचत होईल. तसेच पीफची माहिती. क्लेम आणि ट्रॅकिंग प्रोसेस सोपी झाल्यामुळे कर्मचारी त्याच्या रिटायरमेंटनंतरच्या निधीचे जास्त चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतील.

टीप: EPFO 3.0 संदर्भातील सुविधा टप्प्याटप्प्याने लागू केल्या जाऊ शकतात. संबंधित सेवांचा लाभ घेण्यासाठी अधिकृत EPFO सूचनांची माहिती वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सातपुड्यात पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT