Sakshi Sunil Jadhav
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण इतरांसमोर सभ्य दिसण्यासाठी किंवा कामाच्या गडबडीमुळे शरीराच्या नैसर्गिक गरजा सतत थांबवून ठेवतात.
भूक, तहान, झोप, लघवी, शिंका किंवा जांभई हे शरीराचे नैसर्गिक संकेत असतात. हे सतत थांबवून ठेवल्याने शरीराच्या कार्यात बिघाड होऊ शकतो.
बराच वेळ लघवी थांबवल्याने मूत्राशयावर ताण येतो. त्यामुळे युरिन इन्फेक्शन, किडनीच्या समस्या आणि इतर मूत्रविकारांचा धोका वाढू शकतो.
वेळेवर शौचाला गेलं नाही,तर बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि पचनाशी संबंधित त्रास वाढू शकतो. नियमित सवय बिघडल्याने आतड्यांवर परिणाम होतो.
गॅस किंवा ढेकर थांबवून ठेवल्याने पोटावर दाब वाढतो. त्यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ, पोटदुखी आणि अस्वस्थता अशा समस्या जाणवतात.
शिंक किंवा जांभई ही शरीराची संरक्षणात्मक प्रक्रिया आहे. ती तुम्ही जबरदस्ती थांबवून ठेवल्याने डोकं, मान आणि चेहऱ्याच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो.
वेळेवर अन्न आणि पाणी घेतलं नाही तर शरीरातली ऊर्जा कमी होते. त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे आणि एकाग्रतेत घट जाणवू शकते.
रडू येत असल तर ती भावना दाबून ठेवल्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. बरेच दिवस असं केल्याने मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.
शरीर जेव्हा एखादा संकेत देतं, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी प्रतिसाद दिल्याने अनेक आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात.
ही माहिती सर्वसाधारण आरोग्यविषयक जागरूकतेसाठी आहे. कोणतीही आरोग्य समस्या असल्यास किंवा लक्षणे दीर्घकाळ टिकत असल्यास डॉक्टर किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.